Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांकडून भाजप पुरस्कृत उमेदवार तेलींचा नामोल्लेखही नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सावंतवाडी - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कणकवली येथील जाहीर सभेत 35 मिनिटांच्या भाषणात सावंतवाडी मतदारसंघात भाजप पुरस्कृत म्हणून मिरवणाऱ्या राजन तेली यांचा साधा नामोल्लेखही केला नाही. यातच तेली उघडे पडले, अशी टीका शिवसेनेचे नेते जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. 

सावंतवाडी - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कणकवली येथील जाहीर सभेत 35 मिनिटांच्या भाषणात सावंतवाडी मतदारसंघात भाजप पुरस्कृत म्हणून मिरवणाऱ्या राजन तेली यांचा साधा नामोल्लेखही केला नाही. यातच तेली उघडे पडले, अशी टीका शिवसेनेचे नेते जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. 

Vidhan Sabha 2019 : कणकवलीत उद्धव ठाकरे यांची राणेवर आगपाखड 

नारायण राणे यांना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश दिला हे साऱ्या जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता हा प्रवेश म्हणजे राणेंना आत्मपरीक्षणाची गरज आहे, असेही श्री. परूळेकर म्हणाले. येथील पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी श्री. परूळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

भाजप पक्षविरोधी काम करणाऱ्या चाैघांची सिंधुदुर्गात हकालपट्टी 

यावेळी जिल्हा उपसंघटक शब्बीर मणियार, उमा वारंग, प्रतिक बांदेकर, विशाल सावंत आदी उपस्थित होते. परूळेकर म्हणाले, ""कणकवली येथे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या सभेत राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन झाला; मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 35 मिनिटांच्या भाषणामध्ये सावंतवाडीतुन अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या व स्वतःला भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणणाऱ्या तेली यांचा साधा उल्लेखही केला नाही. ज्या अर्थी ते भाजप पुरस्कृत म्हणून मिरवत आहेत त्याअर्थी त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या तोंडून अपेक्षित होता; परंतु तसे न झाल्याने एक प्रकारे ते उघडे पडले आहेत.''

Vidhan Sabha 2019 : घरे ७, मतदार २२ अन्‌ विकास सात कोस दूर!  (व्हिडिओ) 

ते म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांनी आक्रमकता, संयम यावर भाजपात प्रवेश करणाऱ्यांना सूचक वक्तव्य करताना एक प्रकारे डोस दिला आहे. आज तेली यांना मतदार ते राहतात कुठे असा प्रश्‍न विचारत आहेत. मुळात स्थानिकांना येथे प्रतिनिधित्व देणे स्वभाविक असून बाहेरच्यांना मतदार संधी देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.'' 

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी कोकणात शिवसेनेवर टाळली टिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Jayendra Parulekar comment on Rajan Teli