महानगर पालिका निवडणूक लढविणारी महिला निघाली दलाल...

police raided girls found in this condition at chhattisgarh
police raided girls found in this condition at chhattisgarh

रायपूर (छत्तीसगड): रायपूर शहरातील महावीर नगरमधील प्रेम पार्क अपार्टमेंटमध्ये छापा टाकल्यानंतर तीन महिला व तीन पुरुष नको त्या अवस्थेत आढळून आले. चौकशीदरम्यान महानगर पालिका निवडणूक लढविणारी महिला दलाल असल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम पार्क अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. अपार्टमेंटमध्ये छापा टाकला त्यावेळी तीन महिला व तीन पुरुष नको त्या अवस्थेत आढळून आले. एका महिला दलालासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली महिला दलालने हानगर पालिका निवडणूक लढवली होती. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिस अधकारी संजय पुंढिर यांनी सांगितले की, 'प्रेम पार्कमधील 101 नंबरच्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. घटनास्थळावरून सात जणांसह एक चाकू जप्त करण्यात आला आहे. शहरामधील यापूर्वीही सेक्स रॅकेट नष्ट करण्यासाठी अनेकदा पावले उचलली आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com