डावं-उजवं काय करताय? राष्ट्रपतींनी नेते अन् कार्यकर्त्यांना दिले देशभक्तीचे धडे!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

आपला देश हा लोकशाहीप्रधान देश असून जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी आपली ओळख आहे. ही ओळख जपणं आपलं कर्तव्य आहे.

नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून येथे सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण केले. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींनाही कळकळीचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, ''तुम्ही कोणत्या विचारसरणीचे नेते किंवा कार्यकर्ते आहात, त्यापेक्षा तुम्ही या देशाचे नागरिक आहात हे महत्त्वाचं आहे. आणि त्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या देशाची प्रतिष्ठा ही पक्षप्रतिष्ठेपेक्षा महत्त्वाची आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.''

- रामजन्मभूमी निर्णयावेळी भारतीयांनी परिपक्वता दाखवली : राष्ट्रपती

ते पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कलम 370, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), एनआरसी, तिहेरी तलाक या मुद्द्यांवरून देशात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे असे दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. त्याबरोबर नागरिकांमध्येही दोन गट निर्माण झाले आहेत. देशातील एकतेला ही गोष्ट हानिकारक ठरणारी आहे. 

- INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी

केवळ रस्त्यावरच नाही तर सोशल मीडियावरही आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं असून हिंदू-मुस्लीमांमध्ये द्वेष भावना वाढीला लागली आहे. आपला देश हा लोकशाहीप्रधान देश असून जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी आपली ओळख आहे. ही ओळख जपणं आपलं कर्तव्य आहे,'' असे म्हणत राष्ट्रपतींनी सगळ्यांचेच कान टोचले आहेत.

- जम्मू काश्मीर पोलिसांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 1 जवान जखमी

ते पुढे म्हणाले, ''भारत हा सर्वधर्म समभाव जपणारा देश आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांची जपणूक करणारा देश आहे. त्यामुळे बापूंचे राष्ट्रहिताचे विचार सर्वच राजकीय पक्षांनी पुढे न्यावेत. संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रतिनिधींनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रुपांतर करून इच्छेचा मान राखला त्याबद्दल मला समाधान आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Ramnath Kovind comment about CAA and Mahatma Gandhi