Anantnag Encounter: दहशतवाद्यांसाठी काळ ठरणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सचे ऑपरेशन कसे राबविले जाते?

Anantnag Encounter: दहशतवादाचा नायनाट करण्याची जबाबदारी या शूर तुकडीच्या हाती आहे
Anantnag Encounter
Anantnag EncounterSakal

Anantnag Encounter: काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी लढण्याचे काम राष्ट्रीय रायफल्सचे शूर जवान करत आहेत. खोऱ्यातून दहशतवादाचा नायनाट करण्याची जबाबदारी या शूर तुकडीच्या हाती आहे, ही तुकडी 1990 मध्ये स्थापन झाली.

आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या या तुकडीचे सैनिक प्रत्येक क्षणी जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करतात. दोन रायफल्स, अशोक चक्र आणि त्याच्या खाली 'फोर्टीट्यूड अँड ब्रेव्हरी' असं घोषवाक्य कोरलेलं निशाण त्या शूर युनिटचं प्रतीक आहे जे काश्मिर खोऱ्यातून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कायम सज्ज असतात. या युनिटचे शूर सैनिक बघून दहशतवाद्यांचीही गाळण उडते.

सध्या काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत ते दहशतवाद्यांचा मुकाबला करत आहेत. चकमकीत शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग आणि मेजर आशिष ढोणक हे देखील या शूर बटालियनचा भाग होते.

राष्ट्रीय रायफल्स ही भारतीय सैन्यातील सर्वात धाडसी तुकड्यांपैकी एक आहे, ती सर्वात खास आहे कारण ही सैन्याची एकमेव बटालियन आहे ज्यामध्ये पायदळ, तोफखाना, सशस्त्र, सिग्नलपासून ते इंजिनियरपर्यंत सर्व सैनिक एकाच ध्येयासाठी एकत्र येतात ते म्हणजे लढण्यासाठी.

दहशतवाद निर्मूलनासाठी. आधुनिक प्रशिक्षण आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या या बटालियनला काश्मीरमधील ऑपरेशन ऑलआउटची जबाबदारी देण्यात आली आहे.

1990 मध्ये स्थापना

तीन दशकांपूर्वी 1990 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही एन शर्मा यांनी राष्ट्रीय रायफल्सची स्थापना केली होती. या बटालियनचे पहिले डीपी लेफ्टनंट जनरल पी सी मनकोटिया होते.

सर्वप्रथम 6 बटालियन तयार करण्यात आल्या, त्यापैकी 3 बटालियन्सना पंजाबची जबाबदारी देण्यात आली आणि तीन बटालियन काश्मीरमध्ये तैनात करण्यात आल्या.

सध्या जवळपास 65 बटालियन आहेत. विशेष म्हणजे या तुकडीत निम्मे सैनिक पायदळातून भरती होतात, बाकीचे इतर तुकड्यांमधून भरती होतात. दहशतवाद्यांचा शोध घेणे, त्यांना आत्मसमर्पण करायला लावणे किंवा त्यांना ठार मारणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Anantnag Encounter
ना 'वन नेशन, वन इलेनक्शन', ना UCC विधेयक; विशेष अधिवेशनात 'या' मुद्दांवर होणार विचारमंथन

नेहमीच सज्ज

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा करण्याची जबाबदारी राष्ट्रीय रायफल्सवर आहे, अशा परिस्थितीत त्यांना प्रत्येक क्षणी तयार राहावे लागते. माहिती मिळाल्यानंतर ते काही मिनिटांतच तयार होतात आणि ठरलेल्या ठिकाणी जातात, त्यांच्याकडे नियोजन करण्यासाठी फारच कमी वेळ असतो.

नुकत्याच एका मुलाखतीत राष्ट्रीय रायफल्सच्या एका जवानाने सांगितले होते की, कुठेही दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना 10 ते 15 मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचावे लागते. यामध्ये, त्यांना तयार होण्यासाठी दोन मिनिटे दिले जातात, उर्वरित वेळेत ते ऑपरेशनचे नियोजन करतात.

Anantnag Encounter
Anantnag Encounter: "PM मोदींवर भाजप कार्यकर्ते फुलं उधळत होते अन् काश्मीरमध्ये..."; राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

प्रशिक्षण एका खास पद्धतीने दिले जाते

ही तुकडी काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा आणि सामान्य लोकांचे रक्षण करण्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणात प्रत्येक पैलूची विशेष काळजी घेतली जाते.

कारवाईदरम्यान कोणताही व्यक्ती दहशतवाद्यांना पाठिंबा देत असेल, तर त्याने शरण यावे यासाठी प्रयत्न केले जातात. हे त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट आहे.

अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणे सज्ज

राष्ट्रीय रायफल्सचे सैनिक आधुनिक शस्त्रे आणि उपकरणांनी सुसज्ज आहेत. त्यांच्याकडे LMG, 40 mm MGL म्हणजेच मल्टी ग्रेनेड लाँचर, AK 47 आहे, ऑपरेशनवर जाणाऱ्या तुकडीला प्रथमोपचार किट, ड्रोन, एअर मोड कॉर्डन लाईट सोबत ठेवावी लागते.

पाळत ठेवणारी टीम टॅम्बो साइट, थर्मल इमेजेस बनवते. तिच्या मदतीने दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाते. यातून व्हिडिओ देखील बनवता येतात किंवा फोटो सुद्धा क्लिक केले जातात.

Anantnag Encounter
Adani Group: G-20 परिषद संपली अन् गौतम अदानींना लागला जॅकपॉट, मिळाला मोठा प्रोजेक्ट! काय आहे मास्टर प्लॅन?

प्रत्येक क्षणी जीवाला धोका असतो

या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवावी लागते. जर तो शहरी भाग असेल तर दहशतवादी कोणत्या घरात लपले आहेत किंवा कुठून गोळीबार करत आहेत हे समजत नाही. जंगलात देखील अशीच परिस्थिती असते.

एका टीव्ही मुलाखतीत एका सैनिकाने सांगितले की, एअर कॉर्डन लावणारी व्यक्ती सर्वात धोक्यात असते. बहुतेक ऑपरेशन्समध्ये एअर कॉर्डन लावणाऱ्या सैनिकाला पहिली गोळी लागते. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर ते त्यांची ओळख पटवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com