Rewari Boiler Blast: स्पेअर पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीत बॉयलर फुटल्याने भीषण स्फोट; दुर्घटनेत ४० कामगार जखमी तर..

Rewari Boiler Blast: हरियाणामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. लाईफ लाँग कारखान्यात बॉयलर फुटल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 40 कर्मचारी जखमी झाले आहेत.
Rewari Boiler Blast
Rewari Boiler BlastEsakal

Rewari Boiler Blast: हरियाणातील रेवाडी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका स्पेअर पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीच्या कारखान्याच्या आवारातच बॉयलर फुटल्याने कंपनीत काम करणारे ४० हून अधिक कर्मचारी होरपळले आहे, त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हरियाणातील रेवाडी येथील धरुहेरा औद्योगिक परिसरात ही दुर्घटना घडली आहे. लाईफ लाँग फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट होऊन ४० कामगार जखमी झाले आहेत. यामध्ये अनेक कर्मचारी गंभीररीत्या भाजले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तसेच अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

बचाव पथकाने जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी कर्मचाऱ्यांना मोठ्या रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोग्य आणि पोलिस विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. लाइफ लाँग कंपनी स्पेअर पार्ट्स बनवते.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेअर पार्ट्स बनवणाऱ्या रेवाडीच्या लाईफ लाँग फॅक्टरीत हा अपघात झाला. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये 40 कर्मचारी जखमी झाल्याचा दावा केला जात आहे.

Rewari Boiler Blast
Modi Ka Pariwar Song Launch: भाजपकडून 'मोदी का परिवार' गाणं लॉन्च! स्वतः पंतप्रधानांनीचं केलं शेअर

या घटनेबाबत सिव्हिल सर्जन डॉ.सुरेंद्र यादव म्हणाले की, धारुहेरा येथील एका कारखान्यात बॉयलर फुटला आहे. आम्ही रुग्णालयांना सतर्क केले आहे. आम्ही कारखान्यात रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. सुमारे 40 जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रोहतक येथे उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.

Rewari Boiler Blast
Loksabha Election 2024: देशात 543 ऐवजी 544 मतदरासंघात होणार निवडणूक; एक अतिरिक्त मतदारसंघ का? जाणून घ्या

या घटनेबाबत खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, लाईफ लाँग फॅक्टरी येथे झालेल्या दुर्घटनेत मोठ्या संख्येने लोक जखमी झाले. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. या अपघातातील सर्व जखमींना सरकारने चांगले उपचार आणि शक्य ती सर्व मदत करावी.

Rewari Boiler Blast
Lok Sabha Election 2024 : 'मिथ वर्सेस रिअ‍ॅलिटी'....निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच होणार 'फेक न्यूज'चा भांडाफोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com