Sakshi Murder Case: भर रस्त्यात खून होतो अन् लोक बघत राहतात... काय आहे हा लोकांचा बायस्टँर्ड इफेक्ट?

दुल्लीत नुकतेच एका माथेफिरूने अल्पवयीन मुलीची भर रस्त्यात हत्त्या केली, पण तिथे असणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्नही केला नाही.
Sakshi Murder Case
Sakshi Murder Case

What Is the Bystander Effect Of Public : दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात साक्षी नावाच्या एका अल्पवयीन मुलीची निर्घूण हत्या करण्यात आली. खून करणाऱ्या माथेफिरूचं नाव साहिल आहे. त्याला दिल्ली पोलिसने उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातून अटक केली. असं सांगितलं जातं की, साहिल आणि त्या मुलीमध्ये वाद झाले, त्यामुळे रागातून त्याने चाकू, दगड याचे बेछूट वार केले.

पण यात धक्कादायक बाब ही आहे की, तो माथेफिरू वार करत होता तेव्हा तिथे बघ्याची भूमिका घेणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्नही केला नाही. मानसशास्त्रज्ञ त्याला बायस्टँर्ड इफेक्ट म्हणतात.

एकटा माणूस जास्त स्ट्राँग असतो

मानसशास्त्राची थेअरी सांगते की, जेव्हा कोणती गर्दी एखादी घटना बघते तेव्हा तुम्हाला मदत करण्याची शक्यता फार कमी असते. याउलट एकटा माणूस कोणाला अडचणीत बघेल तर तो मदतीला जाण्याची शक्यता अधिक असते.

४० लोक तरुणीचा बलात्कार आणि खून बघत राहिले

हे समजण्याचा प्रयत्न १९६४ मध्ये एका क्रुर घटनेनंतर सुरू झाला. त्यावेळी मार्च महिन्यत एक अमेरिकी मुलगी किटी गेनोवीज आपल्या कामावरून परतत होती. अपार्टमेंटमध्ये पोहचेपर्यंत सर्व ठिक होते. पण ऐन घरासमोर तिच्यावर हल्ला झाला. बलात्कार करून चाकू भोक्सून तिचा निर्घूण खून करण्यात आला.

ही घटना साधारण २० मिनीट चालली. त्यावेळी सुमारे ४० लोक आपल्या घरातून हा प्रकार बघत होते. बलात्काराच्या वेळी ती २८ वर्षांची तरुणी मदतीसाठी किंचाळत राहिली. चक्क २० मिनीटांनी पोलीसांना कॉल गेला. तोवर तिची हत्या झालेली होती.

Sakshi Murder Case
Sakshi Murder Case: साहिलनं 15 दिवसांपूर्वीच खरेदी केला होता चाकू; पोलिसांसमोर केले अनेक धक्कादायक खुलासे

पहिला प्रयोग झाला

लोकांच्या भित्रट मनोवृत्ती, आजाराला गेनोवीज सिंड्रोम नाव देण्यात आला. ४ वर्षांनी मानसशास्त्रज्ञांनी यावर पहिला प्रयोग केला. काही लोकांना एका खोलीत बंद करून त्यात धूर सोडण्यात आला. लोकं खोकलू लागले. पण फक्त ३८ टक्के लोकांनी तक्रार केली. नंतर एकेएकट्याला खोलीत बंद करून धूर सोडण्यात आला तर ७५ टक्के लोकांनी तक्रार केली.

गर्दी कमकूवत आणि घाबरट असते

दुसऱ्या एका प्रयोगात एका महिलेला धोक्यात दाखवले. यावरून लक्षात आले की, गर्दीत मदत मिळण्याची शक्यता ६० टक्क्यांपर्यंत कमी होते. केवळ ४० टक्के लोकच मदतीला तयार असतात. तर उलट एकटा माणूस कोणाला अडचणीत बघतो तेव्हा तो धाडसाने मदत करण्याचा प्रयत्न करतो.

Sakshi Murder Case
Wagholi Classmate Murder Case: विद्यार्थिनींवर खुनाचा गुन्हा दाखल; वाघोली वर्गमित्र खून प्रकरण

असं का होतं?

  • कारण गर्दीत कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसते.

  • दुसऱ्याने पुढे व्हावे असेच प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे एकमेकाच्या तोंडाकडे बघत बसतात.

  • स्वतःला सभ्य दाखवण्याचा प्रयत्न करतात.

  • जर तुम्ही त्या गर्दीत असाल तर तुम्हीही त्यांच्या सारखेच बघ्याची भूमिका घ्याल याची शक्यता जास्त आहे.

  • बऱ्याचदा रस्त्यात होणाऱ्या अशा घटनांना लोक त्यांचा वैयक्तीक प्रश्न समजतात आणि खासगी भानगडीत कशाला पडा असा विचार करतात.

हा बायस्टँर्ड इफेक्ट कसा थांबवावा?

हा परिणाम पूर्णपणे संपवू शकत नाही, पण कमी करता येतो. हे आधी लक्षात घ्यावं की, कोणाचाही खासगी वाद बलात्कार किंवा खूनापर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे अशावेळी इंटरफेअर करणे आवश्यक असते.

असं ठेवा स्वतःला सुरक्षित

  • गुन्हेगाराच्या हातात जर चाकू किंवा पिस्तूल सारखे हत्यार असतील तर थेट भिडण्याऐवजी पहिले आरडाओरडा सुरू करा.

  • बऱ्याचदा गुन्हेगार क्षणिक आवेशात तो गुन्हा करत असतो. अशावेळी जोरात ओरडल्याने त्याचं लक्ष विचलीत होऊन तो गुन्हा करणे थांबवू शकतो.

  • पण या सगळ्या आधी पोलिसांना कॉल केलाच पाहिजे. म्हणजे वेळेत मदत मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com