राजीव गांधींच्या मारेकऱ्याला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

या दोषी ठरलेल्या मारेकऱ्यानं तीस वर्षांहून अधिक काळ शिक्षा भोगली आहे.
Rajiv-Gandhi
Rajiv-Gandhi

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा मारेकरी जो न्यायालयीन प्रक्रियेत दोषी ठरला आहे. त्याला सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) बुधवारी जामीन मंजूर केला. ए. जी. पेरारिवलम (A G Perarivalam) असं या दोषीचं नाव आहे. त्यानं यापूर्वी ३० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला आहे. (SC grants bail to Rajiv Gandhi assassination convict A G Perarivalan)

Rajiv-Gandhi
फडणवीस पोलिसांच्या ताब्यात; मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

कोर्टानं जामीन मंजूर करताना म्हटलं की, "पेरारिवलनने आधीच 30 वर्षांहून अधिक काळ शिक्षा भोगली असल्यानं अतिरिक्त सॉलिसिटर जनरलच्या तीव्र विरोधानंतरही तो जामीन घेण्यास पात्र आहे, असं आम्हाला वाटतं"

Rajiv-Gandhi
युद्धस्थितीमुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, भारतावर काय होईल परिणाम?

खंडपीठानं पुढं असंही म्हटलं की, पेरारिवलन यानं ३२ वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेदरम्यान एकदाही वादामध्ये नव्हता. यापूर्वी त्याची दोनदा पॅरोलवर मुक्तता करण्यात आली होती. त्यावेळी देखील त्याची कुठलीही तक्रार नव्हती.

Rajiv-Gandhi
शेअर बाजाराचा युटर्न; सेन्सेक्स 1223 तर निफ्टी 331.90 अंकांनी वधारला

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर पेरारिवलननं सांगितलं की, सुप्रीम कोर्टानं जरी त्याला जामीन मजूर केला असला तरी राज्यपालांनी त्याच्या तुरुंगातून सुटकेच्या अर्जावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. हे जामीन न मिळण्याचं एक कारण असल्याचं त्यांन म्हटलं आहे. यावर केंद्रानं या अर्जाला विरोध केला होता की, राष्ट्रपती हे योग्य ऑथरिटी आहेत. पेरारिवलनला यापूर्वीच एक फायदा असा मिळाला आहे की त्याची फाशीची शिक्षा रद्द झाली आहे. पण यानंतर आता तो शिक्षेत आणखी सूट मागू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com