esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

पंतप्रधानपदासाठी शिवसेनेचा ममतांऐवजी राहुल गांधींना पाठींबा?

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : सन २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील चेहरा कोण असेल यावर विरोधीपक्षांचं अद्याप एकमत होताना दिसत नाही. पण शिवसेनेनं राहुल गांधी यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दावेदारी नाकारताना शिवसेनेनं तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांना खेळ बिघडवणारे पक्ष म्हणून टीका केली आहे.

हेही वाचा: 'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध; जबरदस्तीनं दुकानं बंद केल्यास...

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीनंही ममता बॅनर्जी यांना पाठिंब्याचे संकेत दिले आहेत. पण राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेनं राहुल गांधींना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच ममतांची दावेदारी नाकारताना तृणमूल काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष खेळ बिघडवणारे पक्ष असल्याच म्हटलं आहे. कारण गोव्यात हे दोन्ही पक्ष विनाकारण काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी मैदानात उतरले आहेत, असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा: भारतीय सैन्य दलात NCCच्या कॅडेट्ससाठी विशेष भरती

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधील 'रोखठोक' या सदरातून खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये राऊत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची तुलना पुन्हा एकदा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. लखीमपूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला तसेच त्यांच्या कार्यपद्धतीत इंदिरा गांधी यांची झलक दिसते असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे एकमेव असे नेते आहेत जे दिल्लीतील भाजप सरकारला मजबूत पर्याय ठरु शकतात, असा दावाही केला आहे.

हेही वाचा: पंतप्रधानपदासाठी शिवसेनेचा ममतांऐवजी राहुल गांधींना पाठींबा?

दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर चर्चेत झालेला तपशील सांगताना राऊत यांनी म्हटलं की, राहुल माझ्याशी बोलताना म्हणाले, "उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढत आहेत, कारण प्रत्येकाचे हात दगडाखाली अडकले आहेत. उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य जाती-धर्मांमध्ये विभागलं गेल्यानं भाजपचा फायदा होत आहे. पण एक वेळी अशी येईल की काँग्रेसचं भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही" असंही राऊत यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलं आहे.

loading image
go to top