6 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून खून; आरोपीला गावकऱ्यांनी मारले

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी अरविंद (वय 32) याचा शोध घेतला. अरविंद हा त्या दुकानातील कामगार होता. यानंतर गावकऱ्यांनी अरविंदला बेदम मारहाण केली. यामुळे गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता, आज (गुरुवार) पहाटे त्याचा मृत्यू झाला.

अलिगढ - उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे एका सहा वर्षांच्या मुलीचा बलात्कार करुन खून केल्याची घटना घडली असून, गावकऱ्यांनी आरोपीलाही बेदम मारहाण केल्याने मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिगढपासून जवळच असलेल्या भिकामपूर गावात ही घटना घडली. बुधवारी सायंकाळी दुकानामध्ये वस्तू आणण्यासाठी ही मुलगी गेली असताना, आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा खून केला. मुलगी बराच वेळ नाही आल्यानंतर शोध घेतला असता ती मृतावस्थेत आढळली.

मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी अरविंद (वय 32) याचा शोध घेतला. अरविंद हा त्या दुकानातील कामगार होता. यानंतर गावकऱ्यांनी अरविंदला बेदम मारहाण केली. यामुळे गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता, आज (गुरुवार) पहाटे त्याचा मृत्यू झाला. अरविंदच्या मृत्यूप्रकरणी 200 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
कल्याण: विमानतळाचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांवर पोलिसांचा गोळीबार

बीड: दोन मुलांना जिवंत जाळून पिता फरार
OLX वर गाडी पाहा, पैसे खात्यात भरा आणि ठणाणा...
'मुख्यमंत्री कानात काय म्हणाले'; जयाजी सूर्यवंशींकडूनच ऐका!
#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण
चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार​
कोल्हापूर: पट्टण कोडोलीत रातोरात हटविले डिजीटल फलक, झेंडे
वारीतल कोंदणं: मनान ठरवल अन् गावाला घडवल​
जिल्हा सहकारी बॅंकांना दिलासा

Web Title: Six-year old girl raped, murdered in Uttar Pradesh's Aligarh; accused lynched by mob