esakal | वर्षाच्या मावळतीला उत्तर भारत गारठला
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीनगर - काश्‍मीरच्या अनेक भागात मंगळवारी मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली. श्रीनगर परिसरातील घरे आणि डोंगर असे हिमाच्छादित झाले होते.

पर्वतरांगात हिमवृष्टी होत असल्यामुळे देशातील बहुतांश भागात गारठा वाढला आहे. काश्‍मीर ते राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड भागातही थंडीची लाट आली आहे.  हिमाचलची राजधानी सिमला येथे हिमवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ४०१ रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे असंख्य पर्यटक अडकून पडले आहेत. पाइपलाइनमध्ये पाणी गोठले आहे. दुसरीकडे राजस्थानच्या बाडमेरमध्ये थंडीने दोन दशकांतील विक्रम मोडला आहे.

वर्षाच्या मावळतीला उत्तर भारत गारठला

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - पर्वतरांगात हिमवृष्टी होत असल्यामुळे देशातील बहुतांश भागात गारठा वाढला आहे. काश्‍मीर ते राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड भागातही थंडीची लाट आली आहे.  हिमाचलची राजधानी सिमला येथे हिमवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ४०१ रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे असंख्य पर्यटक अडकून पडले आहेत. पाइपलाइनमध्ये पाणी गोठले आहे. दुसरीकडे राजस्थानच्या बाडमेरमध्ये थंडीने दोन दशकांतील विक्रम मोडला आहे. गेल्या चोवीस तासात तापमानात ६.४ अंशाने घट होऊन १२.५ वरून ६.१ अंश सेल्सिअसवर पोचला आहे. 

सिमल्यात काल हंगामातील पहिली जोरात हिमवृष्टी झाली. या ठिकाणी तीन इंच हिमवर्षाव झाला. राज्यातील पर्वतरांगांतील भागात हिमवृष्टी तर सखल भागात मुसळधार पाऊस पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपूर्ण राज्यात थंडीची लाट आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ सह एकूण ४०१ रस्ते बंद करण्यात आले आहेत. परिणामी अनेक पर्यटक ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सिमल्यात राज्याबाहेरून सोमवारी तीन हजार तर मनालीत एक हजार गाड्या आल्या. त्याचवेळी अटल टनेल रोहतांग आणि सोलंग व्हॅली येथे वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...'

राजस्थानात थंडीची लाट आली असून गेल्या चोवीस तासात तापमानात घसरण झाली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान चार ते नऊ अंशांनी कमी झाले आहे. बाडमेर येथे वीस वर्षातला विक्रम मोडला गेला आहे. तेथील तापमान ६.१ अंशांवर आले आहे. माउंट अबू येथे तापमानात दोन अंशांनी घसरण होत उणे २ वर पोचले आहे. माउंट अबू येथे सिमला आणि श्रीनगरपेक्षा अधिक थंडी आहे. सिमल्यात उणे १.१ अंश सेल्सिअस तर श्रीनगर येथे ०.६ अंश सेल्सिअस तापमान आहे.  हवामान खात्याने जयपूर, अल्वर, भिलवाडा, चितोडगड, सिकर, बिकानेर, चुरू आदीसह चौदा जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. बहुतांश भागात तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

रजनीकांत यांच्या निर्णयानंतर चाहते खूष; ट्विटरवर जोरदार रिऍक्शन्स

उत्तर भारताला हुडहुडी

  • मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये तापमान ६ अंशांवर 
  • हरियानात चार दिवसांपासून थंडीचा कडाका
  • गुजरातमध्ये किमान तापमान चार अंशांनी घसरले
  • पंजाबमध्ये आगामी दोन दिवसात थंडीची लाट
  • पंजाबच्या मुक्तसर येथे दोन अंश तापमानाची नोंद
  • छत्तीसगडमध्ये सखल भागात धुके दाटले

काश्‍मीरमध्ये बर्फच बर्फ
नवीन वर्षाची चाहुल लागलेली असताना जम्मू काश्‍मीरमध्ये हिमवृष्टी झाल्याने बहुतांश भाग बर्फाच्छित झाला आहे. जम्मू विभागातील पटनी टॉप, नत्थाटॉपपासून श्री माता वैष्णो देवीचा परिसरावर बर्फाची चादर पसरली आहे. हिमवृष्टीने जम्मू-श्रीनगर महामार्ग दहा तास बंद ठेवला.

अखिलेश यादवांनी सुरू केली उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी; विजयाचा केला दावा!

राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका
दिवसभर वाहणारे थंडगार वारे. भर दुपारीही अधूनमधून होणारे सूर्यदर्शन आणि ३.६ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरलेला पारा या स्थितीमुळे दिल्लीतील नागरिक आज गारठून गेले. आगामी दोन दिवसांत पारा २ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज राष्ट्रीय वेधशाळेने वर्तविल्याने कुडकुडणाऱ्या दिल्लीकरांना यंदाचा ३१ डिसेंबर शेकोट्यांच्या किंवा हीटरच्या साहाय्यानेच साजरा करावा लागणार, हे स्पष्ट आहे. 

दिल्लीत उद्यापासून दोन दिवस तापमान २ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतातच थंडीची तीव्र लाट आली आहे. काश्‍मीर व हिमालयीन राज्यांत सुरू असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा व बर्फवृष्टीचा परिणाम दिल्लीसह उत्तर भारतावर झाल्याने नागरिकांना दिवसभर कुडकुडत काढावा लागला. पुढच्या तीन चार दिवस दिल्लीसह हरियाना, पंजाब, राजस्थान, हिमाचल, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये दाट धुक्‍याचीही भर पडणार  आहे.

Edited By - Prashant Patil

loading image