Christmas 2019 : जेव्हा जवान 'जिंगलबेल जिंगलबेल' गाणं म्हणतात... (Video)

वृत्तसंस्था
Wednesday, 25 December 2019

जवानांचा एक ख्रिसमसनिमित्तचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ बघून तुम्हालाही आनंद होईल.

काश्मीर : भारतीय जवान हे नेहमी सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज असतात. कुटूंबियांपासून दूर राहणाऱ्या जवानांच्या आयुष्यात खूप कमी आनंदाचे क्षण येतात. तरीही हे सगळेजण छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीय जवानांचा एक ख्रिसमसनिमित्तचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ बघून तुम्हालाही आनंद होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जवान हे काश्मीरजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) नाताळ साजरा करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. कोणताही जात-धर्म न पाळता सगळेजण पांढऱया रंगाचे ड्रेस घालून जोरजोराच जिंगलबेल जिंगलबेल गाणं म्हणत आहेत. त्यांचा उत्साह इतका आहे की आपणही जिंगलबेल जिंगलबेल गुणगुणू लागतो. या जवान बांधवांपैकी एकाने सांताक्लॉजचा पोशाख परिधान केला आहे व सर्वजण टाळ्या वाजवत, गाणी म्हणत नाताळ साजरा करत आहेत. 

Christmas 2019 : डिलिशीयस प्लम केकची अशी आहे गोष्ट!

Video : ...म्हणे सांताक्‍लॉज आहे अन्‌ सर्वकाही बदलले 

या व्हिडिओत बर्फाच्या बाहुल्या, ख्रिसमस ट्री तयार केले आहेत. सर्व जवान एका रांगेत थांबून प्रचंड थंडीत नाताळ साजरा करत आहेत. या व्हिडिओमुळे देशवासियांचा जवानांबाबतचा आदर पुन्हा एकदा वाढला आहे. अशा प्रकारे जवान सर्व धर्मांचे सण आपल्या कामाच्या ठिकाणी साजरे करत असतात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldiers celebrating Christmas at LOC in Kashmir