AISA students protest at Jantar Mantar
esakal
नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या तीन विद्यार्थ्यांनी तब्बल २३ दिवसांचे अनिश्चितकालीन उपोषण सोमवारी (ता. २०) मागे घेतले. मात्र, सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषण सोडणार (AISA students hunger strike Jantar Mantar) का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.