Gujrat: 'रिझर्व्ह नाही रिव्हर्स बँक ऑफ इंडिया' जप्त केलेल्या त्या नोटांत भलताच Twist...

पंतप्रधान नरेद्र मोदींच्या संभाषणानंतर सुरतच्या लिंबायत भागात पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाली होती
Gujrat Fake Currency
Gujrat Fake Currencyesakal

Surat News: गुजरातमधील सुरतमध्ये पोलिसांनी दोन हजारांच्या नकली नोटांच्या तब्बल सहा पेट्या जप्त केल्या आहेत. या पेट्या पोलिसांनी रूग्णवाहिकेतून जप्त केल्या असून यात नक्ली नोटांची २५ कोटी एवढी रक्कम जप्त करण्यात आली. मात्र या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट म्हणजे या नोटांवर रिझर्व्ह नाही तर रिव्हर्स बँक ऑफ इंडिया असे लिहीले आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेद्र मोदींच्या संभाषणानंतर सुरतच्या लिंबायत भागात पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाली होती. (Gujrat Fake Currency)

योजना आखत पोलिसांची छापेमारी

पोलिसांना सुचना मिळताच अहमदाबाद ते मुंबई महामार्गावरून जाणाऱ्या रूग्णवाहिकेवर पोलिसांनी योजना आखत छापेमारी केली. कामरेज ठाणे पोलीस टीमने या रूग्णवाहिकेतून नक्ली नोटांच्या सहा पेट्या जप्त केल्यात. या पेट्यांत दोन हजारांच्या १२९० नोटांचे बंडल मिळालेत. ही रक्कम एकूण २५ कोटी ८० लाख एवढी होती.

ज्या रूग्णवाहिकेतून नोटा जप्त करण्यात आल्या त्यावर 'दीकरी एज्युकेशन ट्रस्ट मोटा वडाला' असे लिहीले होते. रूग्णवाहिकेतून सापडलेल्या नोटा हूबेहूब खऱ्या दोन हजारांच्या नोटांसारख्याच दिसत होत्या मात्र जवळून बघता त्यावर रिझर्व्ह बँकऐवजी रिव्हर्स बँक ऑफ इंडिया असे लिहीले होते. तसेच या नोटांवर 'केवळ सिनेमाच्या शुटींग'साठी असेही नमूद असल्याने आता रूग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला या प्रकरणाच्या खोलवर पोहोचण्यासाठी विचारपूस करण्यात येत आहे.

Gujrat Fake Currency
Gujrat: संतापजनक! नवजात मुलीला जिवंत गाडलं; आई-वडिलांना अटक

जप्त करण्यात आलेल्या नोटा या कोणत्या सिनेमासाठी नेण्यात येत होत्या आणि रूग्णवाहिकेतूनच का नेण्यात आल्या यावर आता पोलिसांचा तपास सुरू आहे. लवकरच पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागण्याचीही शक्यता यावेळी पोलिसांनी वर्तवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com