Video: मतांसाठी कायपण! प्रचारादरम्यान चक्क उमेदवारानं धुतले कपडे

TamilNadu
TamilNadu

Tamil Nadu Assembly Election 2021: चेन्नई : निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय नेते अनेक आश्वासनं देत असतात. त्यातली किती पूर्ण करतात हा भाग वेगळा. पण मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते हटक्या गोष्टी करत असतात. झोपडीत राहणाऱ्या लोकांसोबत जेवण करणं हा तर नेत्यांचा कॉमन फंडाच बनला आहे. त्यानंतर काही नेत्यांनी मुलांना अंघोळ घालत जरा हटके काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. आता असाच काहीसा प्रकार तमिळनाडूमध्ये पाहायला मिळाला. अण्णाद्रमुकच्या एका उमेदवाराने प्रचारादरम्यान चक्क मतदारांचे कपडे धुतले आणि जर निवडणूक जिंकली तर मतदारसंघातील प्रत्येक घरी वॉशिंग मशिन देण्याचं आश्वासनही दिलं.

हा हटके प्रकार घडला तमिळनाडूच्या नागपट्टीनम या मतदारसंघात. राज्यातील सत्तारूढ अण्णाद्रमुकचे नागपट्टीनम मतदारसंघाचे उमेदवार थांगा कातिरवन आपल्या आगळ्या वेगळ्या प्रचारामुळे सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरले आहेत.  

या संबंधीचा एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. सोमवारी (ता.२२) प्रचारानंतर एआयएडीएमकेचे उमेदवार असलेल्या थांगा यांना रस्त्याने जात असताना एका ठिकाणी कपडे धुण्याची आयडिया मनात आली. त्यामुळे त्यांनी चक्क बैठक मांडत आपल्या मतदारांचे कपडे धुतले. यानंतर त्यांनी निवडणूक जिंकल्यास वॉशिंग मशिन देण्याचं जाहीर आश्वासनही देऊन टाकलं. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो, पण तमिळनाडूमध्ये अशा भेटवस्तू वाटप करण्याची तशी जुनीच परंपरा आहे. 

सध्या तमिळनाडूत प्रचाराला वेग येत आहे. संपूर्ण तमिळनाडूत एकाच टप्प्यात २३४ जागांसाठी ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. तर २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पक्षाने हातमिळवणी केली आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com