श्रीलंकेच्या नौदलाचा भारतीय मच्छीमारांवर हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

नागपट्टीनम: मध्यरात्री समुद्रात मासेमारी करणाऱ्या दोन भारतीय मच्छीमारांवर श्रीलंकेच्या नौदलाने हल्ला करीत त्यांची बोटी आणि जाळेही जप्त केले. मत्स्यपालन अधिकाऱ्यांनी सांगितले, की आज सकाळी किनाऱ्यावर पोचल्यावर या मच्छीमारांनी तमिळनाडू पोलिसांच्या किनारा सुरक्षा विभागाकडे या हल्ल्याबाबत तक्रार केली.

नागापट्टीनम जिल्ह्यातील अरुकट्टुथुराई येथून काल हे मच्छीमार आपले ट्रॉलर घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. कोडीअक्काराई किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ मासेमारी करीत असताना श्रीलंकेच्या गस्तीवरील नौदलाने त्यांना घेरले आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी मासेमाऱ्यांवर हल्ला करीत त्यांना धमकी देत त्यांच्याकडील जाळी आणि मासेमारीचे अन्य साहित्य काढून घेतले.

मच्छीमारांच्या दोन जहाजांचेही मोठे नुकसान झाले असून, या प्रकरणाची मरिन पोलिस चौकशी करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी

Web Title: tamilnadu news nagapattinam srilanka indian fisherman attack