Jammu-Kashmir Temperature
Jammu-Kashmir Temperature

मोठी बातमी! जम्मू-काश्मिरचे तापमान सात अंशांनी वाढणार; कधी ते पहा

श्रीनगर - जम्मू काश्मीर म्हटले की नजरेसमोर येतात, बर्फाच्छादित शिखरे, अतिथंड तापमान. मात्र, जम्मू-काश्मिरबरोबरच, लडाखचे तापमान या शतकाअखेरीस तब्बल ६.९ अंशांनी वाढ होण्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. ‘क्लायमेट चेंज’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हा अंदाज खरा ठरल्यास हिमालयीन प्रदेशातील हिमनद्या ८५ टक्क्यांनी आकुंचित होऊ शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संशोधकांच्या पथकामध्ये काश्मीर विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे प्रा. जासिया बशिर आणि प्रा. इरफान रशिद यांचा समावेश होता. प्रामुख्याने वातावरणातील हरितगृह वायू उत्सर्जनाचा वेग वाढल्याने तापमान वाढेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.  संशोधकांनी तीन हरितगृह वायू उत्सर्जन परिस्थिती अंतर्गत असलेले ११ मॉडेल्स वापरून हे संशोधन केले. जम्मू-काश्मिर आणि लडाखमधील पर्वतमय प्रदेशाला उद्योगीकरणाचा कमीत कमी फटका बसला असला तरी जागतिक तापमानवाढीचा परिणाम होणार आहे. उप-उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशाचा विस्तार होण्याची तर थंड प्रदेशाचे आकुंचन होण्याचीही शक्यता आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरचे प्रा.शकिल अहमद रोमशू म्हणाले, की एकविसाव्या शतकाअखेरीस तीन वेगवेगळ्या परिस्थितीत सरासरी वार्षिक तापमान अनुक्रमे ४.५ अंश, ३.९८ आणि ६.९३ अंश सेल्सिअसने वाढेल. या शतकाअखेरीस जम्मू आणि काश्मीर हिमालयाचे तापमान ६.९ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तापमानाच्या अंदाजापेक्षा अधिक असेल. ते पुढे म्हणाले, की  हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचा सध्याचा दर कायम राहिल्यास या शतकाअखेरीस अगदी वाईट परिस्थितीत जागतिक तापमान सरासरी पाच अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. याच परिस्थितीत भारतातील सरासरी तापमान ४.४ अंशाने वाढू शकते.   तापमानवाढीमुळे जम्मू-काश्मिर आणि लडाखच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हिमालयीन प्रदेशातील महत्त्वाचा स्रोत असलेल्या हिमनद्या तापमानवाढीमुळे ८५ टक्के संकुचित होऊ शकतात. त्यामुळे, सिंधू नदीच्या खोऱ्यातील त्यांचा प्रवाह कमी होऊ शकतो. दक्षिण आशियामधील अनेक देशांमध्ये या नद्या पाणी पुरवतात.
- प्रा.शकिल अहमद रोमशू, युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर

या प्रदेशाचे सर्वेक्षण
जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलिगिट-बाल्टिस्तान, अक्साई चीन, प्रत्यक्ष ताबा रेषा (एलओसी) 

या क्षेत्रांवर परिणाम होणार  
कृषी, फलोत्पादन, पर्यटन

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com