दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘जैशे’च्या चार दहशतवाद्यांना अटक
jk
jksakal

जम्मू : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी आज जैशे मोहंमद या संघटनेचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. आयईडी स्फोटके ठेवलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणत राज्यात तणाव निर्माण करण्याचे या दहशतवाद्यांचे कारस्थान होते. याप्रकरणी चार दहशतवाद्यांसह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काश्‍मीर खोऱ्याप्रमाणेच अयोध्येतील राममंदिर, पानिपत येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीसह देशभरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (Jammu and Kashmir News)

jk
‘रानडे इन्स्टिट्युट’च्या स्थलांतरणाचा निर्णय अखेर रद्द

जम्मूत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमधील एकजण हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. काश्‍मीर खोऱ्यामध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना पाकमधून ड्रोन्सद्वारे शस्त्रपुरवठा करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आयईडीने सुसज्ज असलेल्या वाहनाच्या माध्यमातून घातपात घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा इरादा होता. देशातील अन्य महत्त्वाची ठिकाणे देखील त्यांच्या रडारवर होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. किश्‍तवाड जिल्ह्यात देखील सुरक्षा दलांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर स्फोटके निकामी केली आहेत.

पहिली कारवाई

या कारवाईत सर्वप्रथम मुंताझीर मन्सूर ऊर्फ सैफुल्लाह याला सुरक्षा दलांनी अटक केली होती. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल, मॅगझीन, आठ फैरी आणि दोन चिनी बनावटीचे हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. सैफुल्लाहच्या मालकीच्या वाहनामधूनच काश्‍मीरमध्ये शस्त्रे आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. यापाठोपाठ जैशच्या आणखी तीन दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली असून त्यात इजहार खान ऊर्फ सोनू खानचा समावेश असून तो उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यातील रहिवासी आहे.

jk
डॉ. अमोल कोल्हे यांचा कट्टर विरोधक आढळराव पाटील यांना फोन

सोनू खान याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जैशे मोहंमदचा म्होरक्या मुनाझीर ऊर्फ शाहीद यांच्या सांगण्यावरून त्याने अमृतसर जवळून शस्त्रे गोळा केली होती. ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी ही शस्त्रे टाकण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे. पाकमधील म्होरक्याच्या सांगण्यावरूनच त्याने पानिपत येथील तेल शुद्धीकरण कारखान्याची पाहणी करत त्याचे व्हिडिओ पाकिस्तानात पाठविले होते. अयोध्येतील राम मंदिराचीही पाहणी करण्यास त्याला सांगण्यात आले होते पण हे करण्यापूर्वीच त्याला अटक केली.

jk
देवानं मला 50 वर्ष दिलेत, त्यातील 25 बाबासाहेबांना देते- आशा भोसले

पुलावामातही कारवाई

तौसीफ अहमद शहा ऊर्फ शौकत यालाही जम्मूतच दबा धरून बसण्यास सांगण्यात आले होते. जम्मूत आयईडीचा स्फोट घडवून आणण्यासाठी दुचाकी मिळविण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती.यासाठीची आयईडी स्फोटके ड्रोनच्या माध्यमातून टाकली जाणार होती. जहाँगीर अहमद भट या अन्य एका दहशतवाद्याला पुलवामातून अटक करण्यात आली, तो देखील पाकमधील म्होरक्याच्या संपर्कात होता, अशी माहिती उघड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com