Instagram रिल्स पडले महागात, ट्रेनच्या धडकेत तीन तरुणांनी गमावला जीव

रेल्वे ट्रॅकवर इन्स्टाग्राम रिल्स शूट करणे, तीन तरुणांना चांगलेच महागात पडले.
Three boys got accident while shooting instagram reels on railway track
Three boys got accident while shooting instagram reels on railway tracksakal
Updated on

सध्या इन्स्टाग्राम रिल्सचा ट्रेंड तरुणाईमध्ये जोमाने सुरु आहे. इन्स्टाग्राम रिल्स शुट करण्यासाठी तरुणाई नवनवीन शक्कल लावत असतात मात्र कित्येकदा याची किंमतही त्यांना मोजावी लागते. इन्स्टाग्राम रिल्सच्या आहारी जाणे, तमिळनाडूच्या तीन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. (Three boys got accident while shooting instagram reels on railway track)

गुरुवारी तांबरम - विल्लुपुरम फास्ट पॅसेंजर ट्रेन चेंगलपट्टूकडे जात असताना परनूरजवळ (Parnoor) रेल्वे ट्रॅकवर इन्स्टाग्राम रिल्स शूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन तरुणांचा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या रेल्वेने त्यांना धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Three boys got accident while shooting instagram reels on railway track
सोनम कपूरच्या दिल्लीतील घरात चोरी, दीड कोटींचा ऐवज लंपास

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हे तिघे तरुण गुरुवारी परनूरजवळील रेल्वे रुळाजवळून पायी जात असताना त्यांना इन्स्टा रिल्स बनवण्याची कल्पना सुचली. संध्याकाळी 6.45 च्या सुमारास तांबरम - विल्लुपुरम फास्ट पॅसेंजर ट्रेन चेंगलपट्टूकडे जात असताना ते सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी रुळावर व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना ट्रेनची धडक बसली. या तिघांनी वेगवान ट्रेनच्या वेगाचा चुकीचा अंदाज लावला असेल आणि त्यामुळे ते वेळेवर रुळावरून दूर जाऊ शकले नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Three boys got accident while shooting instagram reels on railway track
'गुरमीत राम रहीम कट्टर कैद्यांमध्ये मोड नाही, म्हणून त्याला पॅरोल'

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की ते रेल्वे स्थानकावर नियमितपणे इन्स्टाग्रामवर दररोज असे व्हिडिओ अपलोड करत होते. याआधी लोकांनी त्यांना ट्रॅकवर बसून व्हिडिओ काढताना पाहिले होते. के मोहन, प्रकाश आणि एस अशोक कुमार अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही चेंगलपट्टूजवळील सिंगापेरुमलकोइल जवळील चेट्टीपुनायम परिसरातील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com