Video : जंगल सफारीवेळी जेव्हा वाघ पर्यटकांचा पाठलाग करतो...

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

या व्हिडिओतील प्रसंग भितीदायक असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

जयपूर : जंगल सफारीमध्ये वाघाचे दर्शन होणे, हा बहुतेक पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र, राजस्थानातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात चक्क वाघानेच पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केल्यानंतर पर्यटकांची भितीने गाळण उडाली. पर्यटकांना रविवारी (ता. 1) आलेल्या या भितीदायक अनुभवाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

फक्त 19 सेकंदांचा हा व्हिडिओ असून, त्यात पर्यटकांच्या वाहनाचा एक वाघ पाठलाग करताना दिसतो आहे. एएनआय वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्‌विटरवर शेअर केल्यानंतर काही वेळातच तो 14 हजारांहून अधिक वेळा रिट्‌विट करण्यात आला आहे.

- 'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही

वाहनाचा वेग वाढविण्यात आल्यानंतरही वाघ त्याच वेगाने धावताना दिसतो आहे. वाहनाचा वेग वाढवून ते उलट्या दिशेला वाघापासून दूर अंतरावर नेण्यात आले. त्यानंतर वाघाने पाठलाग करणे थांबविल्याचे सांगण्यात आले. 

- महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

या व्हिडिओतील प्रसंग भितीदायक असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. तर पर्यटकच वाघांच्या अतिजवळ जाण्याचा खोडसाळपणा केल्यामुळे ही घटना घडल्याचे मत काही जणांनी नोंदविले आहे. 

- Chandrayaan 2 : मोठी बातमी! विक्रम लँडर सापडला, नासाने केले फोटो ट्विट

राजस्थानातील सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध असून, ते देश-विदेशातील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. व्याघ्र दर्शनासाठी अनेक पर्यटक या उद्यानाला भेट देत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger chases safari vehicle at Ranthambore National Park in Rajasthan