Odisha Train Accident : ओडिशात रेल्वेचे अकरा डबे घसरले; एनडीआरएफचे बचावकार्य; एका प्रवाशाचा मृत्यू, सात जखमी
Railway Accident : ओडिशातील कटक जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ एसएमव्हीटी बंगळूर-कामाख्य सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे घसरले, ज्यात एक प्रवाशी मरण पावला.
भुवनेश्वर : ओडिशातील कटक जिल्ह्यातील नेर्गुंडी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात एसएमव्हीटी बंगळूर-कामाख्य सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले.