सियाचीनमधील हिमस्खलनात दोन जवान हुतात्मा

पीटीआय
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

हिमस्खलनाची दुसरी घटना

नवी दिल्ली : लडाखमधील दक्षिण सियाचीनमध्ये 18 हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या लष्कराच्या गस्ती पथकावर शनिवारी पहाटे हिमस्खलन झाले. त्यामुळे दोन जवान यामध्ये हुतात्मा झाले, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सियाचीनमध्ये कर्तव्यावर असलेले दोन जवान हुतात्मा झाले. हिमस्खलन झाल्याने मोठ्या बर्फाखाली अडकलेल्या जवानांना बचाव पथकाकडून वाचविण्याचा मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, गस्ती पथकातील दोन जवानांना वाचविण्यात अपयश आले. त्यांचा यामध्ये मृत्यू झाला, अशी माहिती संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली. दुर्घटनेचे वृत्त समजताच गस्ती पथकाने हेलिकॉप्टरसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. 

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते म्हणाले...

हिमस्खलनाची दुसरी घटना

लडाखमधील दक्षिण सियाचीनमध्ये हिमस्खलन झाले. यापूर्वी 18 नोव्हेंबरला अशा स्वरूपाची घटना घडली होती. यामध्ये 4 जवान हुतात्मा झाले होते तर दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही घटना घडली आहे. गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी घटना आहे. .

बहुमत चाचणीनंतर अमित शहा आता महाराष्ट्रात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Army soldiers Martyr in avalanche in Siachen