अमेरिका भारताला विकणार सुपर हर्क्युलसचे साहित्य

पीटीआय
Saturday, 3 October 2020

सी-130जे सुपर हर्क्युलस मालवाहू विमानांच्या ताफ्यासाठी नऊ कोटी डॉलर किमतीचे साहित्य, सुटे भाग आणि पायाभूत सुविधा पद्धत विकत घेण्याची भारताची विनंती पेंटॅगॉनने मान्य केली आहे.

वॉशिंग्टन - सी-130 जे सुपर हर्क्युलस मालवाहू विमानांच्या ताफ्यासाठी नऊ कोटी डॉलर किमतीचे साहित्य, सुटे भाग आणि पायाभूत सुविधा पद्धत विकत घेण्याची भारताची विनंती पेंटॅगॉनने मान्य केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने उभय देशांतील व्युहात्मक संबंध भक्कम करणे, संरक्षण क्षेत्रातील प्रमुख भागीदाराची सुरक्षा सुधारण्यासाठी परराष्ट्र तसेच राष्ट्रीय सुरक्षा धोरणानुसार हा निर्णय घेतला. राजकीय स्थैर्य आणि शांतता, इंडो-पॅसिफिक तसेच दक्षिण आशिया विभागाच्या आर्थिक प्रगतीला यामुळे चालना मिळेल.

पाकिस्तानवर विश्वास नव्हता, म्हणून लादेनचा ठावठिकाणा लपवून ठेवला- अमेरिका

अत्याधुनिक रडार वॉर्निंग रिसीव्हर, रात्री टेहळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी आणि गॉगल, जीपीएस तसेच इलेक्र्टॉनिक यंत्रणा आदींची खरेदी केली जाईल.

महिला खासदाराची कोरोना असूनही संसदेत एन्ट्री; पक्षातून हकालपट्टी

हवाई दल, लष्कर तसेच नौदलाच्या वाहतुकीविषयक गरजा, स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवतावादी मदतकार्य, विभागांमधील संकट काळातील मदत कार्य यांसाठीच्या गरजा या विमानामुळे पूर्ण होतील. लॉकहीड-मार्टिन या संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण केला जाईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US to sell Super Hercules material to India