'जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए'; वाराणसीत मोदींबाबत पोस्टर्स

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वाराणसीतील सिगरा आणि कचहरी भागात ही पोस्टर्स लावण्यात आली होती. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. ‘खासदार हरवले’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले असून मोदी यांचा फोटोही या पोस्टरवर आहे. यावर मोदी यांनी उद्देशून ‘जाने वह कौन सा देश जहां तुम चले गए’ असेही लिहिण्यात आले आहे.

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये मोदी हरवले असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले. पोलिसांकडून हे पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.

वाराणसीतील सिगरा आणि कचहरी भागात ही पोस्टर्स लावण्यात आली होती. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. ‘खासदार हरवले’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले असून मोदी यांचा फोटोही या पोस्टरवर आहे. यावर मोदी यांनी उद्देशून ‘जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गए’ असेही लिहिण्यात आले आहे. मात्र हे पोस्टर्स कुणी लावले याबाबत काही कळले नाही.

या पोस्टर्सवर मोदीजी सापडले नाही तर पोलिसात त्यांची हरवल्याची तक्रार नोंदवली जाईल, असेही या लिहिण्यात आले आहे. अशा प्रकारचे पोस्टर्स लागल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि हे पोस्टर्स हटवण्यात आले. यापूर्वी अमेठीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हरविल्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये 4 ते 6 मार्च या काळात आले होते. त्यावेळी विधानसभा निवडणुका सुरु होत्या. त्यापूर्वी ते गेल्या वर्षी 22 डिसेंबरला आले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Uttar Pradesh pm Narendra Modi missing poster in Varanasi