मिठाई भरवूनही नवऱ्याची नाराजी नाही दूर झाली, नवरीनं शेवटी कानाखालीच मारली | Viral video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

मिठाई भरवूनही नवऱ्याची नाराजी नाही दूर झाली, नवरीनं शेवटी कानाखालीच मारली

सध्या सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायल होत असतात. लग्नाच्या मंडपात घडणाऱ्या अनेक घटनेचे व्हिडीओ समोर येतात. हे व्हिडीओ कधी थक्क करणारे असतात तर कधी मजेशीर असतात तर कधी आश्चर्य व्यक्त करणारे असतात. असाच एक लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Viral video of bride slapped on groom’s face)

हेही वाचा: आता नाश्ता महागणार! ब्रेडच्या दरातही झाली वाढ

हा व्हिडीओ पाहून काहींना हसू येईल तर काही जण सुन्न होईल. सहसा लग्नाच्या मंडपात नवरी आणि नवरदेव एकमेकांना हार घातल्यानंतर एकमेकांना मिठाईही खाऊ घालतात. मात्र या व्हायल व्हि़डीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांना जबरदस्तीने मिठाई खाऊ घालताना दिसताहेत. या दरम्यान नवरीला भयंकर राग येतो आणि ती चक्क नवरदेवाच्या कानाखाली लावते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू तर आवरणार नाही पण सोबतच तुम्ही सुन्न व्हाल.

हेही वाचा: प्रयागराज हिंसाचार : आरोपीच्या घरावर चालवला बुलडोझर!

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झालाय आणि नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. लग्नाच्या काही क्षणातच असं चित्र आहे तर नंतर कसं होणार अशा आशयाचे कमेंट्स नेटकरी करत आहे.

Web Title: Viral Video Of Bride Slapped On Grooms Face

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top