Walchand Doshi : ब्रिटीश काळात भारताला पहिली विमान कंपनी देणारे उद्योगसम्राट वालचंद हिराचंद दोशी

Walchand Doshi birth annivarsary
Walchand Doshi birth annivarsary esakal

Walchand Doshi : भारतात अनेक मोठे उद्योगपती जन्माला आलेत. त्यातही भारताला विमानाचा पहिला कारखाना देणारे वालचंद हिराचंद दोशी हे वेगळे ठरले. वालचंद हे वेगळ्या वाटा निवडण्यावर विश्वास ठेवत होते. तर ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि व्यवसायासाठी मोठे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होते. वालचंद यांची आयुष्य गाथा स्वतःचमध्येच एक प्रेरणास्त्रोत आहे. चला तर मग आज भेटूया या महान भारतीय उद्योगपतीला.

एकोणिसाव्या शतकात, गुजरातमधील सौराष्ट्र भागातून प्रतिकूल परिस्थितीमुळे दोशी कुटुंब उद्योगासाठी महाराष्ट्रात आले आणि इथेच व्यापारी उद्योग सुरू केले. या दिगंबर जैन, धार्मिक वृत्तीच्या कुटुंबात हिराचंद आणि राजुबाई या दांपत्याच्या पोटी वालचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर १८८२ मध्ये सोलापूर येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर पंधरा दिवसांत मातेचे निधन झाले आणि काकू उमाबाई यांनी त्यांचा पुत्रवत संभाळ केला.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्व काळात त्यांचे कुटुंब बँकिंग आणि कपाशीचे उत्पादन करत होते. त्यांचा कौटुंबिक व्यवसाय खूप चांगला होता आणि कमाई देखील चांगली होती पण वालचंद यांना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात कधीच रस नव्हता. त्याला काहीतरी वेगळे करायचे होते.

वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा व्यवसायाकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात नुकसान सोसावे लागले, त्यामूळे ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले.

Walchand Doshi birth annivarsary
Walk After Food : तरूणांनी जेवल्यानंतर कधी अन् किती वेळ करावी शतपावली?

वालचंद यांनी कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर त्यांनी त्याला रामराम ठोकत स्वत:चे काहितरी करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात देशात रेल्वेचे बांधकाम जोरात सुरू होते. त्यापासून प्रेरणा घेऊन वालचंद यांनी रेल्वेतील एक कारकून लक्ष्मण बळवंत फाटक यांच्या भागीदारीत त्यांनी रेल्वेची लहानमोठी कंत्राटे घेतली. हे काम त्यांच्या कौटुंबिक व्यवसायापेक्षा वेगळे होते, परंतु त्यांनी अल्पावधीतच बांधकाम व्यवसायात आपले नाव मोठे केले.

Walchand Doshi birth annivarsary
Hot Food in Fridge : गरम अन्न फ्रीजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य? थर्मोडायनामिक्सच्या सिद्धांतामध्ये सापडले उत्तर

वालचंद त्यांच्या व्यावसायिक भागीदारासह पाठक-वालचंद लिमिटेड नावाची कंपनी उघडली. वालचंद हे रेल्वे कंत्राटदार म्हणून खूप चांगले काम करत होते. पण त्यांना उंच झेप घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारसोबत काम करण्यास सुरुवात केली. ब्रिटीश सरकारसोबत काम करताना त्यांनी अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम केले. आणि ज्ञान मिळवले जे नंतर त्यांच्या व्यवसायात कामी आले.

Walchand Doshi birth annivarsary
Avoid Foods With Milk: दूधासोबत 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

केवळ रेल्वे नाही तर उत्तर भारतात सिंधू नदीवरील कलबाग पूल, ब्रह्मदेशातील इरावती नदीवरील पूल अशी महत्त्वाची कंत्राटे त्यांना मिळाली. १९२९ साली ते कंपनीचे कार्यकारी संचालक झाले. १९३५ साली टाटांनी आपला भाग विकला, कंपनीचे नाव ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ असे ठेवले. वालचंद यांच्या कष्टामूळेच या कंपनीने बांधकाम व्यवसायावर आपल्या नावाची मोहर उठवली.

Walchand Doshi birth annivarsary
Healthy Lifestyle: ब्रेकफास्टमध्ये करा 'हे' पाच बदल; पोट दिसेल एकदम फ्लॅट

पहिली विमान कंपनी

पहिले महायुद्ध संपले आणि अचानक शिपिंग उद्योगात तेजी आली. आतापर्यंत भारतात फक्त ब्रिटीश शिपिंग कंपन्याच राज्य करत होत्या. आता भारताला स्वतःची शिपिंग कंपनी मिळावी, अशी वालचंद यांची इच्छा होती. मात्र, हे काम तितके सोपे नव्हते. परदेशी शिपिंग कंपन्यांशी स्पर्धा करण्याच्या प्रक्रियेत अनेकांचे दिवाळे निघाले होते. पण वालचंद दोशींचे मन कधीच खचले नाही. त्यांनी नेहमी ध्येयाकडे वाटचाल केली.

Walchand Doshi birth annivarsary
Healthy Lifestyle: खायच्या पानामध्ये चुना का लावतात?

वालचंद दोशी फक्त शिपिंगवरच थांबले नाहीत. समुद्रानंतर आता त्याची नजर आकाशाकडे लागली होती. यामुळे त्यांनी 1940 मध्ये हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी सुरू केली. त्यांच्या या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतात अनेक विमाने बनवली.

Walchand Doshi birth annivarsary
Tourism : देशात २०२१मध्ये १५लाखांहून अधिक पर्यटक

शिपिंगसोबतच वालचंद दोशी यांनी शिपयार्डही बांधले. त्यांनी विशाखापट्टणम येथे एक शिपयार्ड तयार केले. काँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, या शिपयार्डचे पहिले विमान 'जल उषा' देखील जवाहरलाल नेहरूंनी लॉन्च केले होते.

Walchand Doshi birth annivarsary
Tourism break : प्रवासी सुविधेअभावी पर्यटनास ‘ब्रेक’

भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत वालचंद दोशी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कंपनीचे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध केले होते. तथापि, भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 1953 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा या हरहुन्नरी उद्योगसम्राटाला स्मृतीदिनी अभिवादन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com