esakal | लष्कराला पंधरा दिवसांत धावपट्टी देऊ
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin-Gadkari

लष्कराला पंधरा दिवसांत धावपट्टी देऊ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालोर/बारमेर (पीटीआय) : लष्करासाठी सीमेलगत पंधरा दिवसांतच धावपट्ट्या विकसित केल्या जातील, असे आश्‍वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले. गडकरी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आपत्कालीन धावपट्टी क्षेत्राचे अनावरण करण्यात आले. राजस्थानच्या जालोरच्या गंधव भाकासर विभागात राष्ट्रीय महामार्ग-९२५ वर धावपट्टी तयार केली आहे.

हेही वाचा: Podcast: 'दहशतवादी म्हणू नका अन्यथा..' ते पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १९ महिन्यात सट्टा-गंधव दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग-९२५ लगत धावपट्टी तयार केली आहे. यावेळी गडकरी म्हणाले, की आजचा क्षण अतिशय चांगला आहे. या ठिकाणच्या कामाची गुणवत्ता अतिशय उत्तम असून हा ऐतिहासिक क्षण आहे. काल हवाई दल प्रमुखांशी चर्चा करताना बारमेरची आपत्कालीन धावपट्टी तयार करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागल्याचे ते म्हणाले. परंतु यापुढे धावपट्टी तयार करण्यास उशीर होणार नाही. आपण लष्करासाठी धावपट्टी दीड वर्षाऐवजी पंधरा दिवसात तयार करून देऊ, असे आश्‍वासन हवाईदलप्रमुखाला दिल्याचे गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा: बायकोनं इतकं छळलं की नवऱ्याचं वजन 21 किलोनं घटलं!

राष्ट्रीय महामार्ग ९२५ हा हवाई दलाच्या विमानाला उतरण्यासाठी प्रथमच उपयोगात आणला जाणार आहे. या ठिकाणी लष्कराने लवकरच लहान विमानतळ उभारावे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. माझ्या माहितीनुसार परिसरात ३५० किलोमीटरपर्यंत कोणतेही विमानतळ नाही. त्यामुळे सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांना लहान विमानतळ उभारण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. तुम्हाला जर जमीन हवी असेल तर मी देईल. या ठिकाणी खासगी विमानांनी आठवड्यातून एक- दोन दिवस सेवा सुरू केली तर स्थानिक नागरिकांना देखील फायदा होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: BRICS : कोरोना काळात सामूहिक प्रयत्नांनी मिळालं यश - PM मोदी

साडेतीन किलोमीटर लांबीइमरजन्सी लँडिंग स्ट्रिपची लांबी ३.५ किलोमीटर आहे.या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाप्रमाणेच अन्य प्रकारचे विमानही उतरू शकतील. जानेवारी २०२१ रोजी या धावपट्टीचे काम पूर्ण केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बारमेर राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक जितेंद्र चौधरी यांना पुरस्कार दिला होता. भारतीय हवाई दल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या देखरेखीखाली जीएचव्ही इंडिटा प्रायव्हेट लिमीटेडने आपत्कालीन धावपट्टीची निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या बारमेर आणि जालौर जिल्ह्यातील दळणवळणात सुधारणा होणार आहे. या धावपट्टीव्यतिरिक्त कुंदनपुरा, सिंघानिया आणि बाखासर गावात गरजेनुसार तीन हेलिपॅड तयार केले आहेत. इमरजन्सी लँड फिल्डचे काम जुलै २०१९ रोजी सुरू झाले आणि जानेवारी २०२१ मध्ये पूर्ण झाले.

हेही वाचा: राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

"भारत कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे.तीन किलोमीटरची धावपट्टी १९ महिन्यातच तयार केली आहे. कोरोनाकाळातही या धावपट्टीचे काम सुरू होते. ही धावपट्टी केवळ युद्धासाठीच नाही तर कोणत्याही आपत्तीच्या वेळी उपयुक्त ठरणार आहे. भारताचे तिन्ही दल नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज आहे."

- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

loading image
go to top