esakal | PM मोदींनी ती विनंती ऐकली, पण पॅकेजवर ममतादीदींनी नाक मुरडले!

बोलून बातमी शोधा

West Bengal,Mamata Banerjee , PM Modi

पंतप्रधान मोदींनीही राज्याती भीषण परिस्थिती लक्षात घेत राजकीय मतभेद बाजूला ठेवून ममता बॅनर्जींच्या विनंतीनंतर राज्याचा दौरा केला. ममता बॅनर्जी यांच्यासोबतच मोदींनी अम्फान प्रभावित परिसराची हवाई पाहणी केली. त्यानंतर मोदींनी राज्यासाठी 1000 कोटी पॅकेजही जाहीर केले.

PM मोदींनी ती विनंती ऐकली, पण पॅकेजवर ममतादीदींनी नाक मुरडले!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर राज्यात झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुद्द पाहणी करावी, अशी विनंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी केली होती. पंतप्रधान मोदींनीही राज्याती भीषण परिस्थिती लक्षात घेत राजकीय मतभेद बाजूला ठेवून ममता बॅनर्जींच्या विनंतीनंतर राज्याचा दौरा केला. ममता बॅनर्जी यांच्यासोबतच मोदींनी अम्फान प्रभावित परिसराची हवाई पाहणी केली. त्यानंतर मोदींनी राज्यासाठी 1000 कोटी पॅकेजही जाहीर केले. या पॅकेजसंदर्भात ममता बॅनर्जी नाखुश असल्याचे दिसते. चक्रीवादळामुळे राज्यात अधिक  नुकसान झाले असून केंद्राकडून मिळालेली मदत अपूरी असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

गांधी कुटुंबियांच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या महिला आमदाराचे प्रियांका गांधींवर टिकास्त्र 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मोदींची सविस्तर चर्चा केली. मोदींसोबतच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये 1 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने नुकसान भरपाईसाठी तात्काळ 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. संकटजन्य परिस्थितीत एकत्र मिळून काम करायला हवे, अशी आशाही मोदींना बोलून दाखवल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मिळाली मोठी जबाबदारी
 
ममता बनर्जी पुढे म्हणाल्या की, पंतप्रधानांनी आपतकालीन निधीतून 1000 कोटी रुपये देण्याची घोषणाक केली आहे. पण ही रक्कम अग्रीम स्वरुपातील आहे की पॅकजमध्ये याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. यासंदर्भात ते नंतर निर्णय घेणार आहेत. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यानुसार आम्ही विवरण देऊ असेही मोदींना स्पष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील बशीरहाट तसेच अन्य प्रभावित भागातील पाहणीनंतर मोदींनी एक व्हिडिओ संदेश शेअर केला होता. चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन-दोन लाख रुपयांची मदत तर गंभीर जखमी झालेल्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयाची मदत दिली जाईल, अशी घोषणाही मोदींनी केली होती. पश्चिम बंगालमधील चक्रीवादळामुळे जवळपास 77 जणांनी आपला जीव गमावला आहे.  

दोन महिन्यानंतर दिल्ली पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर
 

बनर्जी म्हणाल्या आहेत की, चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ प्रतिक्षा करावी लागेल. पश्चिम बंगालमधील सात ते आठ जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका बसला आहे. राज्यातील जवळपास 60 टक्के लोक या आपतकालीन परिस्थितीमुळे संकटात सापडले आहेत.