esakal | 'तृणमूल'च्या उमेदवाराचं कोरोनामुळे निधन

बोलून बातमी शोधा

TMC Kajal Sinha

शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा प्रसार वेगाने झाल्याने प्रचारावर निर्बंध आले आहेत. निवडणूक आयोगाने सभा आणि प्रचारफेरी काढण्यास मनाई केली आहे.

'तृणमूल'च्या उमेदवाराचं कोरोनामुळे निधन
sakal_logo
By
वृत्तसंस्था

West Bengal Assembly Election : कोलकाता : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. उर्वरित राज्यांमध्येही कोरोना हळूहळू शिरकाव करू लागला असून पश्चिम बंगालमध्ये त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आज सकाळी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याचे कोरोनामुळे निधन झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

हेही वाचा: राज्याला केंद्राकडून रेमडेसिव्हिरची मदत; ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

काजल सिन्हा असं या उमेदवाराचं नाव असून त्यांचे कोरोनाने निधन झाले. सिन्हा हे पश्चिम बंगालमधील खर्दाहा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. त्यांचे निधन झाल्याचे कळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ममतांनी स्वत: ट्विट करत सिन्हांच्या निधनाची बातमी दिली.

ममता म्हणाल्या की, 'खूप दु:खद आणि धक्कादायक. खर्दाहामधील तृणमूलचे उमेदवार काजल सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी आपले आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले होते आणि अथक निवडणुकीचा प्रचारही केला होता. दीर्घकाळापासून सेवा बजावणारे ते तृणमूलचे सदस्य होते. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.'

हेही वाचा: महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू, देशात आढळले साडेतीन लाख रुग्ण

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा प्रसार वेगाने झाल्याने प्रचारावर निर्बंध आले आहेत. निवडणूक आयोगाने सभा आणि प्रचारफेरी काढण्यास मनाई केली आहे. याशिवाय सभेला केवळ पाचशे लोकांनाच हजर राहण्याचे बजावले आहे, असेही आयोगाने स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांसाठीची मतदान प्रक्रिया संपुष्टात आली आहे. सातव्या आणि आठव्या टप्प्यातील मतदान अनुक्रमे २६ आणि २९ एप्रिलला होणार आहे.

हेही वाचा: 17 राज्यात कोरोनाची लस फ्री; पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रचार सभेवर मर्यादा आणलेल्या असताना राजकीय नेते आता पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी सभा घेत आहेत. विधानसभेच्या मतदानादरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या तीन विशेष निरीक्षकांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले असून या कारस्थानाच्या विरोधात आपण निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा बोलपूर येथील सभागृहात मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी दिला.