
फक्त ११ तासात १०० किलोमीटर अंतर धावून विक्रम करणाऱ्या योगगुरूचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. पवन सिंघल असं त्यांचं नाव आहे. पतंजलि कायाकल्प योग क्लासच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना योगाचे धडे दिले होते. त्यांनी आतापर्यंत ११६ वेळा रक्तदान करून विक्रम केला होता. मात्र सकाळी २ तास धावल्यानंतर ते योगा क्लासला जात असताना वाटेतच कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांची प्राणज्योत मालवली.