Mobile Gaming : ‘मोबाईल गेमिंग’मधील करिअरचे पर्याय

भारतातील गेमिंग उद्योगाने प्रचंड मोठी वाढ अनुभवली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतात तब्बल १५.४ अब्ज गेम डाउनलोड्सची नोंद झाली. जगभरातील गेम डाउनलोड्सच्या यादीत पहिला क्रमांक पटकावत भारत गेमिंगविश्वातील आघाडीचा देश ठरला आहे.
Career Options in Mobile Gaming
Career Options in Mobile GamingSakal

Career options in Mobile Gaming : भारतातील गेमिंग उद्योगाने प्रचंड मोठी वाढ अनुभवली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतात तब्बल १५.४ अब्ज गेम डाउनलोड्सची नोंद झाली. जगभरातील गेम डाउनलोड्सच्या यादीत पहिला क्रमांक पटकावत भारत गेमिंगविश्वातील आघाडीचा देश ठरला आहे.

इंटरनेट कनेक्टिव्हिटीतील वाढ, स्मार्टफोन्सचा प्रसार आणि ई-स्पोर्टसची वाढती लोकप्रियता यामुळे गेमिंगला मुख्य प्रवाहात येण्यास चालना मिळाली आहे. देशातील गेमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात पुणे पहिल्या क्रमांकाचे ‘गेमिंग शहर’ आहे.

करिअरचा पर्याय

गेमिंगला कायदेशीर क्रीडा प्रकार आणि उद्योग म्हणून मान्यता मिळते आहे. एक व्यावसायिक ई-स्पोर्टस क्रीडापटू होण्यापासून ते गेमिंग कंटेंट तयार करण्यापर्यंत अनेक करिअर संधींचा खजिना या उद्योगात आहे. यासाठी समस्या निवारण आणि सांघिक कामापासून सर्जनशीलता व धोरणात्मक विचारापर्यंत अनेक प्रकारची कौशल्ये आवश्यक आहेत. गेमिंग उद्योगामध्ये २०२५ सालापर्यंत २,५०,००० रोजगारसंधी निर्माण होण्याची शक्यता आहे. (Mobile Gaming Careers)

Career Options in Mobile Gaming
Career in Gaming : गेमिंग क्षेत्रात आहेत करिअरच्या उत्तम संधी.. देशात पुणे ठरलं पहिल्या क्रमांकाचं शहर!

वैविध्यपूर्ण संधी

खेळाडूंपलीकडील ई-स्पोर्टस : गेमिंगमधील करिअर म्हणजे ई-स्पोर्टस क्रीडापटू होणे असे अनेकदा गृहीत धरले जात असले, तरी वास्तव याहून खूप वेगळे आहे. ई-स्पोर्टस कंपन्यांना त्यांचे संघ व कार्य ही पूरक कामे करण्यासाठी विविध प्रकारचे व्यावसायिक लोक आवश्यक असतात.

खेळाडूंच्या दैनंदिन उपक्रमांवर देखरेख ठेवण्यात संघ व्यवस्थापकांची भूमिका निर्णायक स्वरूपाची असते. प्रशिक्षक खेळाडूंना व्यूहरचनात्मक प्रशिक्षण देतात. अन्य कोणत्याही क्रीडा समारंभाप्रमाणेच यातही इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग व प्रायोजकत्व या संधी आहेतच.

खेळाचा विकास : एखाद्या संकल्पनेचे रूपांतर खेळण्याजोग्या वास्तवात करणे हा गेम विकसित करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. गेम डेव्हलपर्स काही विषयांत निष्णात असतात. उदाहरणार्थ, गेम प्ले प्रोग्रामिंग, ग्राफिक्स प्रोग्रामिंग, लेव्हल डिझाइन, कॅरेक्टर मॉडेलिंग, ऑडिओ इंजिनिअरिंग इत्यादी. त्यामुळे यातही संधी आहे.

आर्ट डिझाइन : व्हिडिओ गेम्ससाठी दृश्य घटक तयार करण्याची प्रक्रिया गेम आर्ट डिझाइनमध्ये येते. यामध्ये व्यक्तिरेखा व वातावरणाच्या आरेखनापासून ते ॲनिमेशन व स्पेशल इफेक्ट्सपर्यंत सर्व काही येते. गेमचे रूप, तसेच त्याबद्दलची जाणीव स्पष्ट स्वरूपात मांडणारे सौंदर्यपूर्ण दृश्य घटक निर्माण करण्याची जबाबदारी त्या आर्टिस्टवर असते.

Career Options in Mobile Gaming
YouTube Earning : हॉबीला द्या बिझनेसचं रूप! यूट्यूबवर गेमिंग चॅनल बनवून कमावू शकता लाखो रुपये..

गेम मार्केटिंग : गेमिंगचे मुबलक पर्याय खेळाडूंचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे जागरूकता व सहभाग वाढविण्यासाठी प्रभावी मार्केटिंग धोरणांचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. त्यातूनच गेम मार्केटिंग व्यावसायिकांना गेम्सचा प्रसार करण्याच्या तसेच प्रेक्षकांशी संवाद साधण्याच्या संधी मिळतात.

गेमिंग इन्फ्लुएन्सर्स : गेमिंग इन्फ्लुएन्सर्सचे महत्त्व खूपच वाढले आहे. त्यांच्या डिजिटल उपस्थितीचा लाभ घेऊन वैविध्यपूर्ण यूजरशी त्यांना जोडून घेतले जाऊ शकते आणि त्यातूनच गेमिंग संस्कृती आकाराला येते. खिळवून ठेवणारा कंटेंट आणि ब्रँड्ससोबत धोरणात्मक सहयोग यांच्या माध्यमातून हे इन्फ्लुएन्सर्स मार्केटिंगला चालना देऊ शकतात.

Career Options in Mobile Gaming
Online Gaming Safety Tips : ऑनलाईन गेमर्सना केंद्राने दिला गंभीर इशारा, सुरक्षेसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स!

संघ व्यवस्थापन : कुशल आणि उत्साही खेळाडूंचा संघ जोपासण्यासाठी तितकाच चांगला संघ व्यवस्थापक लागतो. खेळाडू व विकसकांमधील संवादात व्यवस्थापक मदत करू शकतो.

देशात ई-स्पोर्टसला चालना देण्यासाठी, तसेच त्यातील प्रतिभा जोपासण्यासाठी अनेक गेमिंग ब्रँड्स राज्य सरकारांशी संपर्क साधत आहेत. भारतातील गेमिंग क्षेत्रातील करिअरच्या पर्यायांमुळे गेमिंग व तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्यक्तींसाठी संधींचे अवकाश आता खुले झाले आहे.

- अनुज सहानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com