1st Std Admission : पहिलीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षांची अट; ‘आरटीई’तील २५ टक्के सोडून ७५ टक्के प्रवेशाला मान्यता

३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा वर्षे पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करता येतील. सहा वर्षे पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र तथा दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल.
1st Std Admission
1st Std AdmissionSakal

Ahmednagar News : ३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा वर्षे पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करता येतील. सहा वर्षे पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र तथा दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. ‘आरटीई’नुसार अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर असणार आहे.

विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा अधिक ताण पडू नये, यासाठी केंद्र सरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीतील प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता खासगी असो की शासकीय शाळांना सहा वर्षे पूर्ण नाहीत, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही.

1st Std Admission
Education Policy : " ‘मनुष्यबळ’ला भाव, ‘कुशल’चा मात्र अभाव ; उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार अभ्यासक्रमनिर्मितीची गरज

कमी वयात पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत संधी लवकर मिळते तर काहींना नोकरीची संधी इतरांच्या तुलनेत जास्त मिळते, अशीही उदाहरणे पाहायला मिळतात.

जन्म दाखला काढायचा कसा?

बाळाचा जन्म ग्रामीण भागात झाला असल्यास संबंधित ग्रामपंचायतीत किंवा शहरात जन्म झाला असल्यास नगरपालिका किंवा महापालिकेत त्याची माहिती द्यावी लागते. अनेकदा रुग्णालयाकडूनही नावे जातात, त्याची देखील पालकांनी खात्री करावी.

1st Std Admission
RTE Admission: आरटीईच्या १० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द; प्रवेश मिळवण्यासाठी सादर करण्यात आलं होतं बोगस प्रमाणपत्र

बाळाचा जन्म झाल्यापासून २१ दिवसांत माहिती संबंधित कार्यालयात द्यावी लागते. २१ दिवसांपेक्षा अधिक दिवस होऊनही बाळाच्या जन्माची नोंद न झाल्यास आता तहसीलदारांच्या माध्यमातून जन्मदाखला मिळतो.

अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता पहिलीची स्थिती

  • एकूण झेडपी शाळा : ३५४५

  • अंदाजे प्रवेशित विद्यार्थी : ९० हजार

  • ‘आरटीई’तील शाळा- ४०५४

  • २५ टक्क्यांनुसार प्रवेश -५१,३५१

प्रवेशाचा वर्ग -जन्मतारीख - वयोमर्यादा

  • नर्सरी -१ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ - ३ वर्षे

  • ज्युनिअर केजी -१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० - ४ वर्षे

  • सिनिअर केजी -१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ -५ वर्षे

  • इयत्ता पहिली -१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ - ६ वर्षे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com