Railway Recruitment 2020: फक्त मुलाखत द्या अन् रेल्वेत नोकरी मिळवा

Railway_Recruitment
Railway_Recruitment

East Central Railway Recruitment 2020: नवी दिल्ली : पूर्व-मध्य रेल्वेने जनरल ड्युटी डॉक्टर आणि विशेषज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. भरती या करारानुसार आणि एका वर्षाच्या कालावधीसाठी असतील. दर वर्षी नवीन करार करण्यात येईल (12 वर्षांपेक्षा जास्त नाही) किंवा रिक्त पदांवर नियमित डॉक्टरांच्या निवडीपर्यंत यूपीएससीद्वारे कराराचे नूतनीकरण केले जाईल.

भरतीसाठी इच्छुक उमेदवार ७ डिसेंबर २०२० रोजी पूर्व मध्य रेल्वे भरती 2020 च्या वॉक-इन-इंटरव्ह्यू (मुलाखत) मध्ये सहभागी होऊ शकतात.

East Central Railway Recruitment 2020: भरती प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे :

- सीएमपी (विशेषज्ञ): 1 जागा
- सीएमपी (विशेषज्ञ): 1 जागा
- सीएमपी / जीडीएमओ: 3 जागा

पात्रता :
- सीएमपी (तज्ज्ञ) : एमबीबीएस + एमडी (मेडिसिन)
- सीएमपी (विशेषज्ञ) : एमबीबीएस + डिप्लोमा / एमएस इन ऑप्थल्मोलॉजी
- सीएमपी / जीडीएमओ : एमबीबीएस (आयसीयूमध्ये प्रशिक्षितांना प्राधान्य मिळेल.)

सर्व उमेदवारांची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया / मेडिकल कौन्सिल ऑफ स्टेटमध्ये नोंदणी असणे अनिवार्य आहे.

मुलाखतीचा तपशील :
वॉक-इन इंटरव्ह्यू (मुलाखती)साठी ठिकाण : कॉन्फरन्स हॉल, 1 फ्लोवर सेंट्रल कम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल/ ईसीआर/ पटना / करबिगहिया.
- मुलाखतीची तारीख : 7 डिसेंबर 2020
- वेळ : सकाळी 10.30 वाजता

भरतीशी संबंधित इतर माहिती आणि अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com