IIT, NIT मध्ये शिकण्याचे आहेत अनेक फायदे, तुम्हीही अ‍ॅडमिशन घेणार असाल तर समजून घ्या हे 8 पॉइंट्स

आज आपण ८ सोप्या पॉइंट्सद्वारे IIT आणि NIT मध्ये शिकण्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होते ते समजून घेऊया.
Advantages Of Taking Admission In NIT & IIT
Advantages Of Taking Admission In NIT & IITesakal

Advantages Of Taking Admission In NIT & IIT : दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्याला कलाटणी देणारी असते. इंजिनीयरींग क्षेत्राकडे वळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं हे स्वप्न असतं की त्याला त्याचं ड्रिम कॉलेज IIT किंवा NIT मिळावं. कारण इथे शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर प्रवेश मिळतो. एवढेच नव्हे या विद्यालयांत शिकण्याचे विद्यार्थ्यांना अनेक फायदेही आहेत. आज आपण ८ सोप्या पॉइंट्सद्वारे IIT आणि NIT मध्ये शिकण्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होते ते समजून घेऊया.

१) शिक्षणाचे सर्वोत्तम साधन आणि संधी

तुम्हाला तुमची प्रतिभा, कौशल्य आणि उत्तम कामगिरी दाखवण्यासाठी IIT आणि NIT ही विद्यालयं उत्तम आहेत. तुम्हाला कंम्प्युटर सायन्ससह इतर ट्रेडमधून बी.टेकचा अभ्यास करायचा असेल, तर या संस्था तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. कारण इथे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या संधी दिल्या जातात.

२) इकॉनॉमिक सपोर्ट

तुमची रँक JEE Advanced किंवा JEE Main मध्ये चांगली असेल तर तुम्ही येथे प्रवेश घेऊ शकता. या संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांनाही आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते.

Advantages Of Taking Admission In NIT & IIT
Advantages Of Taking Admission In NIT & IIT

३) एक्सपर्टायइज प्रोफेसर्सकडून शिकण्याची संधी मिळते

आयआयटी आणि एनआयटी ही संस्थाने देशातील सर्वोत्तम संस्थाने मानली जातात. बीटेक व्यतिरिक्त इतरही अनेक कोर्सेस इथे चालवले जातात. विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळाल्यास उत्तम प्राध्यापकांकडून शिक्षण घेण्याची संधी मिळते. कारण आयआयटी आणि एनआयटीचे प्राध्यापक विविध प्रकारच्या परीक्षांनंतर निवडले जातात.

४) प्रतिभावान लोकांशी भेटण्याची आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळते

या संस्थांमध्ये प्रवेश परीक्षेनंतर प्रवेश घेतला जातो. त्यामुळे इथे चांगले गुण मिळवणाऱ्यांनाच प्रवेश मिळू शकतो. या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आयक्यू इतरांच्या तुलनेत खूप चांगला असतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांकडून खूप काही शिकू शकता. शिक्षणाची व्याप्ती केवळ अभ्यासक्रमांपुरती मर्यादित नाही. त्यापेक्षा तुम्ही इतर राज्यांची संस्कृतीही बर्‍याच प्रमाणात जाणून घेऊ शकता. (Education)

Advantages Of Taking Admission In NIT & IIT
IIT Recruitment : आयआयटीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी

५) प्लेसमेंट

आयआयटी आणि एनआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट उत्तम असते. त्यामुळे इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्वल असते. त्यांची प्लेसमेंट देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये होते.

६) जॉब सेक्यूरिटी

आयआयटी आणि एनआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक नोकरीची सुरक्षा असते. कारण त्यांच्याकडे इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त कौशल्य आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणवत्ता इतरांपेक्षा चांगली असते.

Advantages Of Taking Admission In NIT & IIT
IIT Job : आयआयटीमध्ये प्राध्यापकांची भरती; १ लाखांहून अधिक पगार घेण्याची संधी

७) अल्युम्नी

येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांचेही सहकार्य मिळते. बहुतेक मोठ्या कंपन्यांमध्ये या ठिकाणचे विद्यार्थी मोठ्या पदांसाठी निवडले जातात. येथील विद्यार्थ्यांना नोकरी बदलण्यात किंवा शोधण्यात कोणतीही अडचण येत नाही.

८) आयुष्यभर शिकण्याची संधी

आयआयटी आणि एनआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर शिकण्याची संधी मिळते. येथील विद्यार्थी देशातील तंत्रज्ञान इ. विकसित करतात. त्यामुळेच इथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही समाजात सन्मान मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com