India Post Office Recruitment 2022 : आतापर्यंतची सर्वात मोठी भरती, ९८००० जागांसाठी करा ऑनलाईन अर्ज

पोस्ट ऑफिसमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासंबंधीत सर्व माहिती वाचा.
India Post Office Recruitment 2022
India Post Office Recruitment 2022esakal

India Post Office Recruitment 2022 : इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी ९८, ०८३ जागा आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत.

१० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफीस व्हॅकेन्सी २०२२ (Post Office Vacancy 2022) च्या संकेतस्थळावर भेट द्या.

India Post Office Recruitment 2022
#RECRUTMENT : `या` प्रवर्गातील उमेदवारांची सोलापूर महापालिकेत भरती 

शैक्षिक पात्रता

  • कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासा.

  • पोस्टमॅन पदासाठी - मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.

  • मेलगार्ड पदासाठी - मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

  • एमटीएस पादासाठी - मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

Region wise vacancy
Region wise vacancyesakal
India Post Office Recruitment 2022
Post Office Scheme : फक्त 299 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळणार 10 लाखांचा फायदा
Region wise vacancy
Region wise vacancyesakal

वयाची मर्यादा

या पदांसाठी अर्जदाराची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्ष एवढी आहे.

श्रेणींसाठी सवलती

  • एसटी/एससी - ५ वर्ष अधिक म्हणजे ३८ वर्षापर्यंत

  • ओबीसी - ३५ वर्षापर्यंत

  • इडब्ल्युसी - एनए, पीडब्ल्यु साठी १० वर्ष अधिक, ओबीसी १३ वर्ष अधिक

  • पीडब्ल्यूडी एससी/एसटी १५ वर्ष अधिक

India Post Office Recruitment 2022
Government Job Vaccancies : सरकारी नोकरीत साडेतीन हजार पेक्षा जास्त जागा, १० वी पास करू शकतात अर्ज

पगार

३३, ७१८ ते ३५, ३७० रुपये प्रती महिना.

यासाठी १०० रुपये परिक्षा फी असणार आहे. सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

India Post Office Recruitment 2022
Government Job : दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; पगार ६९ हजार

अर्ज कसा करावा

  • www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जावं.

  • होम पेजवर India Post Office Recruitment 2022 वर क्लिक करा

  • पूर्ण वाचून मग अर्जाच्या लिंकवर क्लिक करा

  • मोबाइल वरून करत असल्यास तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल.

  • सबमीट करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com