esakal | अकरावी प्रवेशाची निश्चिती उद्यापासून; कट ऑफ लिस्टचा टक्का घसरला
sakal

बोलून बातमी शोधा

admission

अकरावी प्रवेशाची निश्चिती उद्यापासून; कट ऑफ लिस्टचा टक्का घसरला

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : यंदा अकरावी प्रवेशासाठीचा कट ऑफ लिस्टचा टक्का घसरला. राजाराम महाविद्यालयात विज्ञान शाखेचा 92.90, न्यू कॉलेजचा वाणिज्य 79.60, तर कला शाखेचा कट ऑफ 74.40 टक्‍क्‍यांवर क्‍लोज झाला. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाल्याने त्याचा परिणाम कट ऑफच्या घसरणीवर झाला आहे. दरम्यान, उद्यापासून (ता. 8) निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित करावा, असे आवाहन सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी केले आहे. ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे.

शहरातील तेहतीस महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश परिक्षा झाली. अकरावीच्या तिन्ही शाखांसाठी एकूण 9810 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, उपलब्ध 14 हजार 680 जागांपेक्षा हा आकडा कमी राहिला. नोंदणीपैकी 9726 विद्यार्थी छाननीत पात्र ठरले. यात व्यवस्थापन, अल्पसंख्यांक व इनहाऊसमधील 366 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत 2004 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसला तरी त्यांना दुसऱ्या व अंतिम फेरीत प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा: CET 2021 : 15 सप्टेंबरपासून CET परीक्षेला सुरुवात

छाननीत 84 अर्ज अपात्र ठरले. अर्जासोबत गुणपत्रक व दाखला दुसऱ्याचा जोडण्याचे प्रकार झाले. काही विद्यार्थ्यांनी कोव्हिड प्रमाणपत्रही जोडले. जातीचा दाखला व हमीपत्र जोडण्यास काही जण विसरले. त्यांना एसएमएस व कॉल करून नव्याने कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले. तरीही त्यांनी पुन्हा तीच री ओढली. त्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेशाची संधी मिळेल, असे सहायक शिक्षण संचालक चौगुले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: 'घुमान' राष्ट्रीय तीर्थस्थळ घोषित करा : नागरिकांचे केंद्राकडे साकडे

* विज्ञान शाखा

* एससी * एसटी * व्हीजेएनटीए * एटीबी * एनटीसी * एनटीडी *एसबीसी * ओबीसी * इडब्ल्यूएस * ओपन

- राजाराम महाविद्यालय * 80.80 * 75.00 * 79.60 * 74 * 81 * 67.20 * 69 * 79.80 * 70.40 *92

- विवेकानंद महाविद्यालय * 79.60 * 78.20 * 64.20 * 79 * 82.60 * 75.80 * 59 * 76.40 * 66 * 91.20

- न्यू कॉलेज * 79.80 * 72 * 68 * 78.60 * 80.40 * - * 82 * 79 * 70.20 * 91.20

- एस. एम. लोहिया * 77.60 * 54.20 * 59.20 * 73.40 * 77.20 * - * 70.40 * 73.20 * 66.80 * 90.60

- महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनि. कॉलेज * 75.40 * - * 77.40 * 74.20 * 80 * - * 74.40 * 71.60 * 73.80 * 90

* वाणिज्य (मराठी)

* एससी * एसटी * व्हीजेएनटीए * एटीबी * एनटीसी * एनटीडी * एसबीसी * ओबीसी * इडब्ल्यूएस * ओपन

- न्यू कॉलेज * 66.80 * - * 64.40 * 77.60 * 73.40 * 75.60 * 58 * 60.40 * 61 * 79.60

- कॉमर्स कॉलेज * 59.20 * 75 * 58.20 * 66 * 69.40 * - * 67.40 * 52.80 * 63.20 * 77.20

- विवेकानंद महाविद्यालय * 68.60 * - * 62.80 * 65 * 69.80 * - * 72.20 * 45.60 * 70.40 * 77.20

- महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनि. कॉलेज * 58.60 * - *70 * 68.60 * 66.80 * - * - * 56.20 * - * 76.40

- मेन राजाराम हायस्कूल * 58.40 * - * - * 62 * 63.20 * - * - * 63.80 * - * 76.20

हेही वाचा: शिक्षक पर्व २०२१ : पंतप्रधान मोदींनी सुरू केले महत्वाचे उपक्रम

* वाणिज्य (इंग्रजी)

* एससी * एसटी * व्हीजेएनटीए * एटीबी * एनटीसी * एनटीडी *एसबीसी * ओबीसी * इडब्ल्यूएस * ओपन

- कॉमर्स कॉलेज * 68.40 * 71.20 * 55.60 * 81.80 * 66.60 * - * 76.40 * 77.80 * 67.40 * 92.40

- विवेकानंद महाविद्यालय * 55.20 * - * 57.40 * 77.60 * 49.80 * 69.60 * 60 * 65 * 70.80 * 88.40

- डी. डी. शिंदे सरकार * 53.80 * - * 74 * 78.80 * 52.40 * - * 67.40 * 70.80 * 79.40 * 88.40

* कला (मराठी)

* एससी * एसटी * व्हीजेएनटीए * एटीबी * एनटीसी * एनटीडी *एसबीसी * ओबीसी * इडब्ल्यूएस * ओपन

- न्यू कॉलेज - 58.80 * - * 57.60 * 65.20 * 65.60 * - * 60.60 * 48.60 * 56.40 * 72.60

- नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स * - * - * - * - * - * - * - * - * - * 72.20

- नेहरू हायस्कूल अँड ज्युनि. कॉलेज * - * - *- *- *- *- *- *- *- * 68

- राजाराम महाविद्यालय * 54.20 * - * 65 * 50 * 54.20 * 53.80 * - * 39.80 * 52.20 * 67.60

- भाई माधवराव बागल हायस्कूल अँड ज्युनि. कॉलेज * - * - * - *- *- *- *- *- *- * 66.80

* कला (इंग्रजी)

- डी. डी. शिंदे सरकार कॉलेज * 48.80 * - * - * 58.40 * - * - * - * 51 * - * 66.40

loading image
go to top