इन्फॉर्मेशन क्‍लॅरिटी इज पॉवर! 

- माधव गोखले 
Saturday, 4 January 2020

खरंतर एखाद्या वर्षातली गाजलेली पुस्तकं कोणती, हा प्रश्नच अवघड आहे. ज्या प्रश्नाला सर्वांना पटेल असं एकच एक उत्तर असूच शकत नाही, अशा जातकुळीतले काही प्रश्न असतात, हा त्यातलाच. या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिगणीक बदलत जातं. पुस्तकांपुरतं बोलायचं तर ‘बेस्ट बुक्‍स ऑफ द ईयर’च्या वेगवेगळ्या याद्यांचा हा एक मार्ग असू शकतो

इतिहासाच्या पानांमध्ये चारच दिवसांपूर्वी जाऊन बसलेलं २०१९ अनेकांसाठी अनेक अर्थांनी अनेकविध भावभावनांचं, घटना-घडामोडींचं वर्ष होतं. तशी जाणारी सगळीच वर्षं अशीच असतात, पण २०१९ दुसऱ्या सहस्रकातल्या पहिल्या शतकातलं शेवटचं टीन इयर होतं. थर्टीन ते नाइन्टीन. तेरा ते एकोणीस ही टीन इयर्स माणसाच्या आयुष्याच्या घडणीतली ही वर्षं अनेक अर्थांनी महत्त्वाचीच! या पुढची टीन इयर्स अवतरतील ती चौऱ्याण्णव वर्षांनी. या शतकाबरोबर सहस्रकाचं विशीत पदार्पण होत असताना, काही पुस्तकं मात्र काही काळ मनात रेंगाळतील. 

नव्या ज्ञानाच्या निर्मीतीसाठी.
 

खरंतर एखाद्या वर्षातली गाजलेली पुस्तकं कोणती, हा प्रश्नच अवघड आहे. ज्या प्रश्नाला सर्वांना पटेल असं एकच एक उत्तर असूच शकत नाही, अशा जातकुळीतले काही प्रश्न असतात, हा त्यातलाच. या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिगणीक बदलत जातं. पुस्तकांपुरतं बोलायचं तर ‘बेस्ट बुक्‍स ऑफ द ईयर’च्या वेगवेगळ्या याद्यांचा हा एक मार्ग असू शकतो. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द गार्डियन’, ‘टाइम’, ‘न्यूयॉर्कर’ अशा मंडळींच्या याद्यांवर नजर टाकली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या त्या वर्षात कोणत्या लेखकांच्या कोणत्या पुस्तकांची चर्चा झाली, त्याचा अंदाज येतो. पुस्तकांच्या या विषयवार याद्यांचा आणि त्याबरोबरच प्रसिद्ध होणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वाचणाऱ्या मंडळींना भावलेल्या पुस्तकांचा लसावि काढला, तर जगभरातल्या पुस्तकप्रेमींच्या पसंतीला उतरलेल्या पुस्तकांच्या क्रमवारीचा काहीसा अंदाज येऊ शकतो. दुसरा मार्ग अर्थातच सन्मान मिळवलेल्या पुस्तकांचा आणि लेखकांचा. वाचन विषयांचा परीघ वाढवण्यासाठी मात्र या मापदंडाचा निश्‍चित उपयोग होतो. 

भारत आता कल्पनांनी जगावर वर्चस्व गाजविणार

अशा वेगवेगळ्या याद्या पाहताना मला एका पोस्टरची आठवण येते. नेमकं कधी ते पोस्टर बघण्यात आलं आता आठवत नाही, पण एका अनामिकानं सांगितलेलं शाश्वत सत्य मनात रुतून बसलं. भिंतभर पसरलेला एक बुकशेल्फ ते शाश्वत सत्य आपल्यासमोर ठेवतो - ‘रीडिंग कॅन सीरियसली डॅमेज युवर इग्नरन्स.’ वाचनामुळे तुमच्या अज्ञानाला, अजाणतेपणाला, अपरिपक्वतेला गंभीर इजा होऊ शकते. मी वेळ मिळेल तेव्हा पुस्तकांच्या दुकानांत, ग्रंथालयांत जातो. रस्त्याकडेच्या जुन्या पुस्तकांच्या ढिगांशी रेंगाळतो, पुस्तकांच्या प्रदर्शनांमध्ये पुन्हा पुन्हा डोकावतो. दरवेळी पुस्तकं पाहाताना आणखी कितीतरी वाचायचंय हाच विचार मनात डोकावत राहातो. नव्यानं हातात पडणारं प्रत्येक पुस्तक काहीतरी नवीन देऊन जातंच, पण पुन्हा पुन्हा वाचली जाणारी पुस्तकंही दरवेळी नवा वाचनानंद देऊन जातात. 

आता इंग्लिशला घाबरू नका; असं लढा बिनधास्त!

गेल्या वर्षी वाचलेल्या पुस्तकांमधली युवाल नोआह हरारी यांचं ‘ट्‌वेन्टी वन लेसन्स फॉर ट्‌वेन्टीएथ सेंच्युरी’, आमिष त्रिपाठींच्या ‘रामचंद्र’ सीरिजमधलं ‘रावण -एनिमी ऑफ आर्यावर्त’, शोधपत्रकार रितू सरीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं ‘पनामा पेपर्स’, रवी आमलेंचं ‘रॉ’, जयराम रमेश यांचं पी. एन. हक्‍सर आणि इंदिरा गांधी यांच्यावरचं ‘इन्टरट्‌वाईन्ड लाईव्हज्’, रंगनाथ पठारे यांचं ‘सातपाटील कुलवृत्तांत’, रामचंद्र गुहांचं ‘गांधी - द इयर्स दॅट चेन्ज्ड द वर्ल्ड’, प्रणव रॉय - दोराब सोपारीवाला जोडीचं ‘द व्हर्डिक्‍ट - डिकोडिंग इंडियाज इलेक्‍शन्स’ आणि ऍन्ड्र्यू ओटीस यांचं ‘हिकीज्‌ बेंगाल गॅझेट - द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर’ ही लक्षात राहिलेली काही पुस्तकं. 
‘ट्‌वेन्टी वन लेसन्स...’ वाचायला घेतल्यावर पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या हरारी यांच्या पहिल्याच वाक्‍याशी थांबल्याचं आठवतंय. ‘इन अ वर्ल्ड डिल्यूज्ड बाय इररिलेव्हन्ट इन्फर्मेशन क्‍लॅरिटी इज पॉवर’ - असंबद्ध, अप्रासंगिक माहितीच्या महापुरात सापडलेल्या जगात स्पष्टता असणे, हेच खरे सामर्थ्य आहे. मग पुढचे खूप दिवस हे पुस्तक पुरलं. 

(क्रमशः) वाचत राहू आपण! 

अमेरिकेत शिकायला घाबरू नका, या आहेत ईझी स्टेप्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhav Gokhale Writes About Books Information Clarity is Power