वडील चालवायचे चहाचं दुकान, मुलगी झाली IAF फायटर पायलट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

परिस्थितीवर मात करून यशाचं हे शिखर तिनं गाठलं. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी ती हवाई दलात फायटर पायलट बनली आहे.

नई दिल्ली- वडीलांचं चहाचं दुकान असलेल्या मुलीने हवाई दलात फ्लायिंग ऑफिसरचे पद मिळवले. परिस्थितीवर मात करून यशाचं हे शिखर तिनं गाठलं. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी ती हवाई दलात अधिकारी झाली आहे. आंचलचे वडील सुरेश गंगवाल हे मध्य प्रदेशात नीमच इथं बस स्टँडवर गेल्या 25 वर्षांपासून चहाचं दुकान चालवतात.

हे वाचा - ​एक कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि...

मुलीच्या यशाबद्दल वडील सुरेश गंगवाल म्हणाले की, उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर हवाई दलाच्या कर्माचाऱ्यांनी धाडसाने तिथल्या लोकांची मदत केली. ते मदतकार्य आंचलने पाहिलं होतं आणि त्यानंतर तिने फ्लायिंग ऑफिसर होण्याचं स्वप्न बघितलं आणि ते साकार केलं. 

दुसऱ्या प्रयत्नात झाला IAS, अधिकारी होण्यासाठी आई वडिलांनी दिली प्रेरणा

स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी आंचलनं पुस्तकं मिळवली आणि परीक्षेची तयारी सुरू केली. सहाव्या प्रयत्नात तिने ही परीक्षा पास होण्यात यश मिळवलं. मी गेल्या 25 वर्षांपासून चहा विकत आहे. आर्थिक परिस्थितीही बेताचीच असल्याचं सुरेश यांनी सांगितलं. 

हे वाचा : खेडेगावातून थेट ऑक्सफर्ड ते पुन्हा भारतात, वयाच्या 27 व्या वर्षी बनली IPS

आंचलच्या शिक्षणाबाबत सांगताना सुरेश म्हणाले की, अनेकदा तिच्या शाळेची किंवा कॉलेजची फी भरायला पैसे नसायचे. अनेकदा लोकांकडून उधार घेऊन तिची फी भरली. आता ती अधिकारी झाली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

दहावी, बारावीनंतर पुढे काय? घाबरु नका; करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करून आंचलचे अभिनंदन केले आहे. शिवराज सिंग म्हणाले की, नीमचमध्ये चहाचं दुकान चालवणाऱ्या सुरेश गंगवाल यांची मुलगी आंचल आता हवाई दलात लढाऊ विमाने उडवणार. मध्य प्रदेशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आंचल आता देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज झाली आहे. तिचे अभिनंदन आणि शुभेच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh anchal gangwal iaf fighter pilot story