CAT 2021 : कॉमन ऍडमिशन टेस्टसाठी नोंदणी प्रक्रिया झाली सुरू

CAT 2021 : कॉमन ऍडमिशन टेस्टसाठी नोंदणी प्रक्रिया झाली सुरू
CAT
CATCanva
Summary

CAT 2021 कॉमन ऍडमिशन टेस्टसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 4 ऑगस्टपासून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथे सुरू झाली आहे.

सोलापूर : CAT 2021 कॉमन ऍडमिशन टेस्ट (Common Admission Test, CAT 2021) साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच 4 ऑगस्ट 2021 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Indian Institute of Management), अहमदाबाद येथे सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते IIM अहमदाबादच्या अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. या व्यतिरिक्त, सामान्य प्रवेश परीक्षा 28 नोव्हेंबरला होणार आहे. परीक्षा तीन सत्रांमध्ये केंद्र-आधारित चाचणी (CBT) म्हणून घेतली जाईल.

CAT
व्यवस्थापन, नॉन-टेक अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये?

परीक्षेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

कॅट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम IIM अहमदाबाद iimcat.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर मेन पेजवर CAT 2021 नोंदणी लिंकवर क्‍लिक करा. त्यानंतर नोंदणी करा आणि आपला आयडी आणि पासवर्ड तयार करा. त्यानंतर तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. त्यानंतर CAT 2021 नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरा. CAT अर्ज फी भरा आणि आपला फॉर्म सबमिट करा. फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

CAT
अंतिम वर्षासाठी विद्यार्थ्यांना 'कौशल्य' कोर्स बंधनकारक !

या तारखा लक्षात ठेवा

  • नोंदणी प्रक्रिया 4 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल

  • नोंदणी प्रक्रिया 15 सप्टेंबर 2021 रोजी संपेल

  • 27 ऑक्‍टोबर 2021 रोजी प्रवेशपत्र दिले जाईल

  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2021 असेल

  • CAT परीक्षा 28 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येईल

  • CAT परीक्षेचा निकाल जानेवारी 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल (तात्पुरती)

पात्रता

कॅट परीक्षेला बसण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्‍यक आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की पदवीमध्ये कमीतकमी 50 टक्के गुण किंवा समकक्ष सीजीपीए मिळवले पाहिजे. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी किंवा निकालाची वाट पाहणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com