UPSC CDS II 2021 नोटिफिकेशन जारी; कसा करायचा अर्ज?

UPSC Recruitment
UPSC Recruitmentesakal
Summary

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 4 ऑगस्ट 2021 रोजी युपीएससी सीडीएस II 2021चे नोटिफिकेशन जारी केले आहे.

नवी दिल्ली - युपीएससी सीडीएस II 2021, केंद्रीय लोकसेवा आयोगाने 4 ऑगस्ट 2021 रोजी युपीएससी सीडीएस II 2021चे नोटिफिकेशन जारी केले आहे. संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा II साठी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 आहे.

परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना UPSC चे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in च्या माध्यमातून ऑनलाइन फॉर्म भरता येईल. या भरतीच्या माध्यमातून विविध कोर्ससाठी 339 पदांची भरती करण्यात येणार आहे. थेट अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

UPSC Recruitment
कॉमर्समधून करता येणार यशाचे मॅनेजमेंट, वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे सर्वाधिक संधी

व्हॅकन्सी डिटेल्स -

इंडियन मिलिटरी अकॅडमी - 100 पदे

इंडियन नेव्हल अकॅडमी - 22 पदे

एअर फोर्स अकॅडमी - 32 पदे

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी - 185 पदे

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 200 रुपये शुल्क भरावे लागेल. यामधून महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. इतरांना ऑनलाइन माध्यमातून हे शुल्क भरता येणार आहे.

UPSC Recruitment
CAT 2021 : कॉमन ऍडमिशन टेस्टसाठी नोंदणी प्रक्रिया झाली सुरू

अर्ज कसा करायचा?

अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर जा. तिथे "UPSC CDS II" पर्यायावर क्लिक करा. साइटवर मागितलेली माहिती द्या. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करा. कागदपत्रे दिल्यानंतर शुल्क भरा. तसंच या अर्जाची एक प्रिंट काढून ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com