esakal | बीडच्या 'हॉटेल सिटी'ची दम बिर्याणी
sakal

बोलून बातमी शोधा

Biryani

बीडच्या 'हॉटेल सिटी'ची दम बिर्याणी

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

माझं अधूनमधून बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात जाणं होत असतं. मध्यंतरी पुस्तकाच्या निमित्तानं बीड शहरात गेलो होतो. सकाळी सकाळीच दोस्त शशी केवडकरची भेट घेतली. त्याच्याशी गप्पा झाल्या. नाश्ता केला नि नंतर वंजारवाडी इथं जाऊन कामांची माहिती घेतली. गावचे माजी सरपंच वैजनाथ तांदळे यांनी बीडमध्येच जेवून जा, असा आग्रह केला. त्यांनी बीडमध्ये कारंजा रोडवरच्या मरकज मस्जिदजवळच्या हॉटेल सिटीमध्ये पोहोचलो.

हेही वाचा: अब्‍दुल सत्‍तारांना बिर्याणी आठवते; तेव्हाच धुळ्यात येतात का?

शहराच्या मध्यवस्तीत हॉटेल सिटी होतं. हैदराबादला गेल्यानंतर शादाब, पिस्ता किंवा तत्सम हॉटेलात गेल्यानंतर येतो तसा फिल तिथं पोहोचल्यावर आला. मेन्यू कार्ड वगैरे होतं. त्याची गरज फार लागली नाही. ऑर्डर घ्यायला वेटर आल्यानंतर त्याच्याकडं चौकशी केल्यानंतर चिकन मसाला चांगला असल्याचं समजलं. स्टार्टर म्हणून उकडलेली अंडी आणि नंतर चिकन मसाला मागविला. अंडी संपेपर्यंत चिकन मसाला नि चपात्या आल्या. काही ठिकाणी प्लेन पराठा मिळतो तशा पद्धतीच्या त्रिकोणी आकारातील चपात्या. चिकन एकदम टेंडर्ड नि चपात्या देखील मऊ. चिकन मसाल्यात तेलाचा तवंग बराच होता. पण तुलनेनं चिकन फार तिखटजाळ वाटलं नाही. चिकन मसाला पोटात जाऊ लागल्यानंतर प्रचंड समाधान मिळत होतं. थोडं लांब आणि गर्दीच्या वस्तीत असूनही, हॉटेल सिटीमध्ये आल्याचं सार्थक झाल्याचं समाधान प्रत्येक घासागणिक जाणवत होतं.

हेही वाचा: घरीच बनवा हॉटेलस्टाईलचा बिर्याणी रायता; खास टिप्स

चिकन मसाला संपेपर्यंत पोट भरल्याची जाणीव झाली होती. पण सोबत आलेल्या तांदळेंच्या ड्रायव्हरनं तिथली बिर्याणी उत्तम असल्याचं सांगितलं. बिर्याणी कशाप्रकारे तयार केलीय, हे जाणून घेतल्यानंतर मग तिघांत एक बिर्याणी मागविली. मालक आणि शेफ मुस्लिम होता हे बिर्याणी मागविण्याचं आणखी एक कारण. एकदम बढिया दम बिर्याणी...हैदराबादला मिळते तशी. तसाही मराठावाड्यावर हैदराबादचा प्रभाव आहेच. सोबत शोरबाही होता. त्याची फारशी गरज पडलीच नाही.

हेही वाचा: घरी पार्टी असेल तर ट्राय करा व्हेज बिर्याणी

वास्तविक पाहता मसाल्याचा उगाचच अधिक वापर आणि तुपाचा भडिमार न करता उत्तम चव येते ती खरी बिर्याणी. अशा बिर्याणीला शोरबा, रायता वगैरे पदार्थांची काही गरज भासत नाही. फक्त चिकन आणि भात खाल्लं तर कोरडं लागत नाही. जन्नतचा अनुभव येतो.

हेही वाचा: हैद्राबादी आणि पनीर बिर्याणीपेक्षा ट्राय करा ऑलिव्ह वेजिटेबल बिर्याणी

हल्ली बिर्याणीच्या नावाखाली तूपकट, मसालेदार आणि जळजळीत चिकन किंवा मटण राइस खाऊ घातला जातो. पण बीडमध्ये जाऊन हॉटेल सिटीत अप्रतिम स्वादाची दम बिर्याणी खायला मिळणं हा नशिबाचा भाग आहे. भविष्यात कधी बीडला जाणं झालं तर नक्की बिर्याणी खा आणि नशीबवान व्हा.

loading image