Handvo Recipe : नाश्त्यासाठी ट्राय करा गुजरातचा फेमस हांडवा, रेसिपी आहे एकदम सोपी!

Handvo Recipe in Marathi: हांडवा चवीने भरलेला असली तरी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे
Handvo Recipe in Marathi
Handvo Recipe in MarathiSakal Digital 2.0

Handvo Recipe : गुजरात पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे, परंतु येथील स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात. गुजराती लोक खाद्यपदार्थांचे शौकीन म्हणून ओळखले जातात आणि येथील जेवण अतिशय चविष्ट आहे. जर तुम्ही कधी गुजरातला जाण्याचा विचार केलात तर इथल्या खाद्यपदार्थाचा आस्वाद नक्कीच घेता येतो. पण तिथले पदार्थ घरी बनवायलाही सोपे आहेत.

शहरात अनेक असे ठिकाणी असतात की त्या ठिकाणी चवदार खाद्यपदार्थ मिळतात. फाफडा हे खाद्यपदार्थ जरी गुजरात राज्यातला असला तरी आता अनेक ठिकाणी आवडीने खाल्ला जात आहे.  आपल्याला दररोज स्वादिष्ट आणि निरोगी पदार्थ खाण्याची आवड असेल.

ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत चांगलं जेवण मिळतं, मग काय हरकत आहे? नाश्त्यात तुम्ही अनेक पदार्थ खाल्ले असतील. असा चविष्ट फूड हांडवा अगदी ब्रेकफास्टसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. लौकीपासून बनवलेले हँडव्ज सर्वांनाच आवडतात.

Handvo Recipe in Marathi
Sabudana Khichadi Recipe : केवळ आवडते म्हणून नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून खा साबुदाणा खिचडी!

हांडवा चवीने भरलेला असली तरी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे लोक ते मोठ्या आवडीने खातात. जर तुम्हालाही कुटुंबासमवेत गुजराती पदार्थ हंडवा खायचे असतील तर त्याची सोपी रेसिपी जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

साहित्य-

  • ३ वाटी तांदूळ,

  • १ वाटी उडीद डाळ,

  • १/२ वाटी चणा डाळ,

  • २चमचे मेथी दाणे,

  • १/४वाटी दही ,

  • १ वाटी किसलीली दुधी,

  • १/४वाटी चिरलेली कोथिंबीर,

  • २ चमचे आले-लसूण्-मिरची पेस्ट,

  • कडीपत्ता,मीठ,

  • ३ चमचे साखर,

  • १/४ चमचा हळद,

  • १/२ चमचा मीरपूड,

  • १/२ चमचा तीखट,

  • ३ चमचे तीळ,

  • १/२ चमचा मोहरी,

  • १/२ चमचा जीरे,

  • १/४ चमच हिंग,

  • १ चिमूट सोडा.

Handvo Recipe in Marathi
Holi Special Dishes : होळी स्पेशल करा 'या' खास टेस्टी डिश

कृती -:  

  • तांदूळ-डाळी-मेथी दाणे ५ते६ तास भिजवून, धुवून वाटून घेणे.

  • त्यात दही टाकून किमान ८ते१० तास मिश्रण फरमेंट करणे.

  • त्यानंतर त्यात दुधि, कोथिंबीर, मीठ, साखर, मीरपूड, आले-लसूण- मिरची पेस्ट घालून व्यवस्थित हलवून घेणे.

  • १चमचा तेल गरम करून मोहरी,जीरे, कडिपत्ता, हळद, हिंग,दीड चमचा तीळ,ति़खट टाकुन फोडणी करणे व ती तयार मिश्रणात घालणे.

  • चिमूटभर सोडा टाकून हलवणे.

  • हे मिश्रण आता हांडवा करण्यास तयार आहे.

  • नॉनस्टिक कढई मधे १ चमचा तेल गरम करून त्यात थोडे तीळ घालावेत व त्यावर लगेच ३ डाव मिश्रण ओतुन कढईवर झाकण ठेवावे.

  • कढई छोट्या गॅसवर एकदम कमी फ्लेमवर ठेवावी.

८ते १० मिनीटाने हांडव्याची खालची बाजू गोल्डन ब्राऊन रंगावर क्रिस्पी भाजून घ्यावी. नंतर हळूवारपणे चमच्याने हांडवा उलटवून दुसरी बाजू परत ७/८ मिनीटे भाजून घ्यावी. थोडेसे गार झाल्यावर त्याचे काप करून सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com