Keto Diet Recipe : Keto डायट करणाऱ्यांसाठी आगळी वेगळी डिश, लेमन चिकन नक्की ट्राय करा!

आपण नेहमीच बनवायला सोप्पी अन् खायला चटकदार अशी रेसिपी शोधत असतो.
Keto Diet Recipe
Keto Diet Recipeesakal

Keto Diet Recipe : वजन कमी करण्याबाबत बर्‍याच लोकांच्या मनामध्ये विभिन्न अंधश्रद्धा किंवा गैरसमज असतात. काही जण विचार करतात की, आज जंक फूड खाऊन घेतो. जेव्हा वजन कमी करायचे असेल, तेव्हा जास्त एक्सरसाइज करून वजन कंट्रोल करेन. ज्या लोकांचे वजन वाढत आहे.

लठ्ठपणाचा त्रास व्हायला सुरुवात झाली आहे किंवा ज्यांच्या बाॅडीमध्ये अतिरिक्त फॅटमुळे चरबी निर्माण झाली आहे, असे लोक आज जरा खाऊन घेतो, नंतर पूर्ण ताकदीने वर्कआउट करेन या प्रकारच्या गोष्टी सतत बोलत असतात. पण कधीही एक्सरसाइज किंवा वर्कआउट करताना दिसत नाही.

Keto Diet Recipe
Weight Loss Tips: बसून बसून पोट सुटलय...5 पदार्थ रोज खा राहाल मेंटेन

किटो डायट म्हणजे काय (What Is KETO Diet)

कीटो डायटला आपण कीटोजेनिक डायट, लो-कार्ब डायट आणि लो-कार्ब हाई फैट डायट यासारख्या नावांनी देखील संबोधतो. आपण नॉर्मल डायट फाॅलो करतो तेव्हा बाॅडीमध्ये प्रोटीन कार्ब हाय लेवलमध्ये पोहचते.

तसेच प्रोटीन खूप कमी प्रमाणात मिळते आणि फॅट हे मीडियम स्वरुपामध्ये उपलब्ध होते असे आढळले आहे. हे डायट साधारण लोक फाॅलो करतात. म्हणून असंख्य लोक अनहेल्दी असतात. ह्या अनहेल्दी डायटमुळेचे लोक वजन कमी करु शकत नाही.

कीटो डायटमध्ये कार्ब्सचे प्रमाण सर्वात कमी असते. फॅट सर्वाधिक प्रमाणामध्ये तर प्रोटीनचे स्तर हे फॅट आणि कार्ब्सच्या मध्ये मीडियम लेव्हलला असते. हे डायटफाॅलो केल्यास वेट लाॅस व्हायला मदत होईल.

किटो डाएट कसे फॉलो करावे?

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर किटो डाएट बेस्ट ऑप्शन आहे. पण किटो डाएट फॉलो करताना विशेष काळजी घेणे गरजेची असते.

किटो डाएट फाॅलो करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर, न्यूट्रिशनिस्ट किंवा फिटनेस ट्रेनर यांचा सल्ला घेऊ शकता. याशिवाय हे डायट फाॅलो करू नये.

किटो डाएट फक्त वेट लॉससाठीच नाही तर कोलेस्ट्रॉल लेव्हेल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, एनर्जीसाठी , ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत करते.

Keto Diet Recipe
Keto Diet Plan: वेट लॉससाठी किटो डाएटचा विचार करताहेत? जाणून घ्या, कसं करावं?

जर तुम्ही किटो डायट करणार असाल किंवा फॉलो कर असाल. तर तुमच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत. ती आहे लेमन चिकन म्हणजेच चिकन आणि लिंबाचं रसरशीत कॉम्बिनेशन.

साहित्य

200 ग्रॅम चिकन

1 कप दही

मीठ आवश्यकतेनुसार

1 मूठभर कोथिंबीर

1 टेबलस्पून लसूण पेस्ट

2 टेबलस्पून लिंबाचा रस

काळी मिरी आवश्यकतेनुसार

2 टीस्पून मसाला पेपरिका

1 टेबलस्पून तुम्हाला आवडणाऱ्या पालेभाज्या

1 टेबलस्पून बटर

Keto Diet Recipe
'Keto Diet' मुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, संशोधनातून महत्वाचा खुलासा; वाचा सविस्तर

कृती

सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्या. पुढे, एका मोठ्या भांड्यात लिंबाचा रस, दही, मीठ, मिरपूड आणि 1 चमचे पेपरिका घालून चांगले फेटून घ्या.

धुतलेले चिकन या मिश्रणात मॅरीनेट करायला ठेवा. चिकनचे तुकडे आणि तुकडे मिश्रणाने कोट करा. पुढे, चिकन आणि रेफ्रिजरेटरला थोडावेळ मॅरीनेट करा.

आता हे मॅरीनेट केलेलं चिकन शिजवा. एक पॅन घ्या आणि आले लसूण पेस्टसह 1 टेबलस्पून बटर घाला. नंतर मॅरीनेट केलेले चिकन घालून ढवळत राहा. नंतर, उरलेले मसाले आवडत्या पालेभाज्या घाला.

आता भांड्यावर मोठे झाकण ठेऊन शिजवून घ्या. अधून मधून ते चेक करा. मॅरीनेशनमुळे ते पटकन शिजत तरीही करपायला नको यासाठी बघत रहा.

चिकन शिजल्याची खात्री झाली की गॅस बंद करा, आणि लिंबाचे तुकडे आणि कोथिंबीर घाला. असेच सजवून ते गरम गरम सर्व्ह करा, एन्जॉय करा एक वेगळी आणि आरोग्यदायी डिश.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com