Peanut Bhel Recipe : चटपटीत पीनट भेळ बनवण्याची सोपी पध्दत

मधल्यावेळात भूक लागल्यावर काय करावे याचे उत्तर देणारे चविष्ट हलके-फुलके स्नॅक्स म्हणून पीनट भेळेचा पर्याय उत्तम.
Peanut Bhel Recipe
Peanut Bhel Recipeesakal

हायलाइट्स

  • मधल्यावेळात भूक लागल्यावर झटपट बनवता येते.

  • काही मिनीटातच बनते पीनट भेळ.

Peanut Bhel Recipe
तुम्ही हेलिकॉप्टर भेळ खाल्ली का? Video व्हायरल

मधल्या वेळात छोटीशी भूक लागल्यावर काहीतरी हलके-फुलके खाण्यासाठी पीनट भेळ चांगला ऑप्शन आहे. बऱ्याचदा जेवणाव्यतिरीक्त भूक लागते. तर काही लोकांना संध्याकाळच्या चहा सोबत काहीतरी खाण्याची सवय असते. अशावेळी झटपट तयार होणारी ही भेळ बनवावी. ही भेळ जेवढी चविष्ट असते तेवढीच बनवायला सोपी आहे.

Peanut Bhel Recipe
Ashadhi Ekadashi 2022: उपवासाला ट्राय करा टेस्टी आणि हेल्दी भेळ, जाणून घ्या रेसिपी

पीनट भेळ बनवण्यासाठी मिक्स फरसाण बरोबर शेंगादाणे व इतर साहित्य लागते. ही भेळ लहान मुलांना फार आवडते. घरात मित्रांची मैफल बसलेली असताना भूक मिटवण्यासाठी चटकन होणारी ही भेळ बनवचा येईल.

Peanut Bhel Recipe
पाणी पुरी,भेळ खा! वजन घटवा

साहित्य

  • मिक्स फरसाण - अर्धा कप

  • भाजलेले शेंगदाणे - अर्धा कप

  • कांदे - १

  • टोमॅटो - १

  • हिरवी मीरची - १-२

  • चिंचेची चटणी - १ टेबल स्पून

  • पुदिना - ७-८ पाने

  • चिरलेली कोथिंबीर - २ टेबल स्पून

  • चाट मसाला - अर्धा टी स्पून

  • लाल तिखट - पाव टी स्पून

  • काळे मीठ - चवीप्रमाणे

  • लिंबाचा रस - १ टी स्पून

  • सरसो तेल - १ टी स्पून

  • डाळिंबाचे दाणे - २ टेबल स्पून

  • मिठ - चवीनुसार

Peanut Bhel Recipe
Bhel Puri: पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळा, बनवा घरच्या घरी टेस्टी भेळ पुरी

कृती

पहिले मीडियम आचेवर कढई गरम करावी. यात शेकगदाणे टाकून भाजून घ्यावे. नंतर बाजूला काढून त्याचे साल काढून टाकावे. त्यानंतर कांदे, हिरवी मिरची, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात मिक्स फरसाण टाकावे आणि सर्व सामग्री एकत्र करावी. झाली तयार झटपट पीनट भेळ.

Peanut Bhel Recipe
चटपटीत भेळ झाली 'तिखट' : महागाईमुळे वाढवले भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com