Dream Job: घरबसल्या पिझ्झा खा, नेटफ्लिक्सवर सीरिज बघा अन् कमवा ५०० डॉलर!

टीम ई-सकाळ
Saturday, 16 January 2021

९ फेब्रुवारीला जागतिक पिझ्झा डे असून तो असा साजरा करणं कुणाला आवडणार नाही. मस्तपैकी घरी बसून पिझ्झावर ताव मारण्याची संधी सोडू नका.

पुणे : कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आपण घरात बसून होतो. टीव्ही किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर मूव्ही आणि वेब सीरिज पाहण्यात आणि इतर गोष्टी करण्यात आपण वेळ घालवला. आता तसंच तुम्हाला पुन्हा एकदा घरी बसायला सांगितलं तर? घरबसल्या पिझ्झा खा, नेटफ्लिक्सवरच्या सीरिज बघा आणि ५०० डॉलर कमवा असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय कराल? हे काही स्वप्न नाही, तर अमेरिकेतली एका कंपनीची ही ऑफर आहे.  

उस्मानाबादच्या ‘उस्मान’चे गुलाबजाम​

बोनस फाइंडर असं या अमेरिकन कंपनीचं नाव असून नेटफ्लिक्सवर तीन सीरिज पाहण्यासाठी आणि त्यासोबत पिझ्झा खाण्यासाठी तुम्हाला ५०० यूएस डॉलर म्हणजे ३६ हजार रुपये देत आहे. कंपनी प्रोफेशनल बिंग वॉचरच्या शोधात आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ही जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. कंपनीची ही ड्रीम जॉब ऑफर ऐकल्यावर कोण नाही म्हणेल. मोठ्या संख्येत नेटकरी यासाठी अर्ज करत आहेत आणि जॉबची अपेक्षा करत आहेत. 

फूड ट्रेंड : बहोत अच्छी ‘चीज’​

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही ऑफर एक दिवसासाठी असणार आहे. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी घरबसल्या तुम्ही तीन नेटफ्लिक्स शो पाहू शकता. आणि सोबत तीन पिझ्झा खाऊ शकता. विशेष म्हणजे ९ फेब्रुवारीला जागतिक पिझ्झा डे असून तो असा साजरा करणं कुणाला आवडणार नाही. मस्तपैकी घरी बसून पिझ्झावर ताव मारण्याची संधी सोडू नका. फक्त कंपनी त्याबदल्यात तुमच्याकडून सर्वोत्तम पिझ्झा आणि नेटफ्लिक्स शोची माहिती पाहिजे आहे.

Makar Sankranti 2021 : तिळा-गुळाच्या गट्टीचं काय आहे आरोग्यदायी महत्त्व?​

नेटफ्लिक्सच्या सीरिजची स्टोरी आणि प्लॉट यावर आधारीत तुम्हाला त्याचं मूल्यांकन करायचं आहे. अॅक्टिंग, एपिसोड आणि एंडिंगबाबत तुम्हाला सांगावं लागणार आहे. ही सीरिज पाहावी की पाहू नये याचा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे. सोबतच तुम्हाला पिझ्झाबाबतही कलर, चव, टॉपिंग, फ्लेवर आणि त्याची किंमत यावर आधारित मूल्यांकन करावं लागणार आहे. यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता. 

रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- फूड संबंधी आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US company dream job watch netflix and eat pizza and get paid 500 dollar