
Ganeshotsav 2022 : 'शेंदूर लाल चढायो' आरतीचा अर्थ जाणून घ्या
कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात असू दे नाहीतर कोणतेही धार्मिक कार्य, प्रत्येक वेळी गणपतीची आरती केलीच जाते. गणेश हे बुद्धी ज्ञान, व नव्या प्रारंभाचे हिंदु दैवत आहे. त्यामुळे हिंदू घरा घरात गणेशाची आरती होते. पण चालीच्या ओघात बऱ्याच चुका करत आरती म्हटली जाते. अनेकांना आरतीचा अर्थ माहित नसतो. या आरतीचे योग्य शब्द आणि अर्थ जाणून घेऊया.
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को
महिमा कहे न जाय लागत हूं पद को
अर्थ- हत्तीसारखे तोंड असणाऱ्या या देवाच्या शरीरावर चांगल्या प्रकारे शेंदूर लावला आहे. शंकर पार्वतीच्या या मुलाचे विशाल, लाल रंगाचे उदर शोभून दिसते आहे. देवांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या याने हातात गुळाचा खडा धारण केला आहे. याच्या मोठेपणाचे वर्णन करता येत नाही. मी त्याच्या पाया पडतो.
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव
अर्थ - समुदायाचा प्रमुख असणाऱ्या, विद्या व सुख देणाऱ्या हे देवा तुमचा जय जयकार असो. तुमचे दर्शन झाले म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. माझ्या मनाला त्यामुळे फार आनंद वाटतो.
अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥2॥
अर्थ - आठ प्रकारच्या सिध्दी याच्या दासी होऊन राहतात. हा सर्व संकटांचा नाश करतो. विघ्नांचा नाश करतो. सर्व अधिकार धारण करणारा हा देव म्हणजे मूर्तिमंत मांगल्य आहे. हे देवा, एका वेळी एक कोटी सूर्य उगवावेत इतके तुझे तेज आहे. गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाने माखलेले मस्तक चंद्रासारखे सुंदर दिसते. (हत्तीच्या गंडस्थळातून वाहणाऱ्या द्रव पदार्थाला 'मद' म्हणतात.)