Ganeshotsav 2022 : इच्छापूर्ती सिध्दीविनायकाच्या आरतीचा अर्थ जाणून घ्या

भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सिध्दीविनायकाची आरती व त्याचा अर्थ जाणून घ्या.
Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022esakal

मुंबईच नव्हे तर देशभरातले, परदेशातल्या भाविकांची सिध्दिविनायकावर श्रध्दा आहे. देशा-परदेशातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. या सिध्दीविनायकाची आरती व त्याचा अर्थ जाणून घ्या.

Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022: 'हे' पाच गणेश मंत्र दररोज म्हणा; जीवनात काहीच कमी पडणार नाही

सच्चिद्धन चिंतामणि जय जय ॐ कारा

विष्णुमहेश्वरजनका जय विश्वाधारा ।।

विद्याऽविद्यारमणा सच्चित् सुखसारा ।

स्वानन्देशा भगवन् दे चरणी थारा ।। १।।

अर्थ - सत् आणि चित् यांनी परिपूर्ण असणाऱ्या, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या, विष्णू व शंकर हे सुद्धा ज्यांतून उत्पन्न झाले अशा, संपूर्ण विश्वाला आधार देणाऱ्या, ॐकार स्वरूप देवा तुझा जयजयकार असो. ज्ञान आणि अज्ञान या दोहोंतही रममाण होणाऱ्या, सत्, चित् आणि सुख (आनंद) यांचे सारस्वरूप असणाऱ्या, स्वतःमधें आनंदाची अनुभूति घेऊ शकणाऱ्या योगिजनांमधें श्रेष्ठ असणाऱ्या, हे भगवंता तुझ्या पायाशी आम्हाला आश्रय दे ।।१।।

Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातल्या बाजारपेठा सजल्या

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती

तव दर्शनमात्रे हो भक्तेप्सितपूर्ती ।। धृ.।।

अर्थ - सर्व मंगल गोष्टींचे साकार स्वरूप असणाऱ्या हे देवा तुझा जयजयकार असो. तुझें केवळ दर्शन झालें तरी भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. ।। धृ.।।

Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022 : 'शेंदूर लाल चढायो' आरतीचा अर्थ जाणून घ्या

आद्यब्रह्माधीशा योगीहदारामा

करुणापारावारा हे मंगलधामा ।।

मत्सरमुखदनुजारे परिपूरितकामा ।

स्वामिन् विघ्नाधीशा दे निजसुख आम्हां ।। जय ॥२॥

अर्थ - जगाचे मूल कारण असणाऱ्या ब्रह्मावर नियंत्रण ठेवणाऱ्या, योगी लोकांच्या हृदयाला विश्रांती देणाऱ्या, समाधान देणाऱ्या, दयेचा प्रचंड साठा असणाऱ्या, मंगल गोष्टींचे निवासस्थान असणाऱ्या, राक्षसांसारख्या मत्सर वगैरे दुर्गुणांचा नाश करणाऱ्या, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या, विघ्नांवर नियंत्रण ठेवणाऱ्या, जगाचा स्वामी असणाऱ्या हे देवा, आम्हाला खरा आनंद मिळवून दे. ।। २ ।।

Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022: रवी जाधवने घडवला इको फ्रेंडली बाप्पा.. पाहा खास विडिओ..

श्रीमन्मुद्गलशुकमुख दत्तादिक योगी ।

नारायण-गिरिजाधव-रविमुख स्वर्भोगी ।।

तैसे संततरत तव पदकमलीं भोगी ।

भववैद्या शरणांकुशधारी भवरोगी ।। जय ।। ३।।

अर्थ - श्रीमन्मुद्गल शुक वगैरे ऋषी, दत्त वगैरे योगी, विष्णू, शंकर, सूर्य वगैरे सर्व, स्वसामर्थ्याने स्वर्गीय सुख भोगतात. तसें सुख तुझ्या कमळासारख्या पायांशी निष्ठा ठेवणारे सर्व लोक नेहेमी मिळवतात. तू संसारस्वरूपी रोगातून मुक्त करणारा वैद्य आहेस. तुला शरण आलेला संसारयातनांनी पीडलेला रोगी. (त्या रोगाविरुद्ध) शस्त्रधारी बनतो.।। ३।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com