esakal | गणेशोत्सवामुळे पुष्पहारांचे दर दुप्पट; गुलछडीचा दर 800 रुपये किलो
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवामुळे पुष्पहारांचे दर दुप्पट; गुलछडीचा दर 800 रुपये किलो

विविधरंगी फुलांची आवक समाधानकारक असल्याने गणेशोत्सवाच्या सणापर्यंत हारांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवामुळे पुष्पहारांचे दर दुप्पट; गुलछडीचा दर 800 रुपये किलो

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा: गणेशोत्सवाच्या काळात फुलांची व हारांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे, हारांचे दर दुप्पट झाले असून, सार्वजनिक गणेश मंडळांसाठी सर्वाधिक मागणी असणाऱ्या गुलछडीच्या फुलांचा दर सुमारे ८०० रुपये किलोवर गेला आहे. तसेच, विविधरंगी फुलांची आवक समाधानकारक असल्याने गणेशोत्सवाच्या सणापर्यंत हारांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: सातारा : यंदाही पालिकेतर्फे फिरते मुर्ती संकलन केंद्र

गेल्यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे, फुले विक्रेत्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपतींसाठी फुले व हारांची मागणी वाढली आहे. कोरोना कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवडही मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळे, आवक चांगली झाल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदा फुलांचे दर कमी आहेत. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या पावसाने झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भिजलेल्या फुलांचे दर कमी आहेत. मात्र, चांगल्या फुलांची मागणी वाढल्याने त्याच्या किमतीही दुप्पट झाल्या आहेत. तसेच, झेंडू फुलांच्या हाराला मागणी वाढल्याने सातारा जिल्ह्यात पुणे, सोलापूरसह कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.

हेही वाचा: पुणे-सातारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

फुलांचे दर

- गुलछडी : ८०० रुपये किलो

- शेवंती : ३०० ते ४०० किलो

- झेंडू : ५० ते १५० किलो

- गुलाब फूल : १५ ते २० रुपये

हेही वाचा: नवी मुंबई ते सातारा,जावळी प्रवासी भाडे ५०० ते ६०० रुपये; बसचालकांकडून लूट

"यंदा गणेशोत्सवात फुलांचे दर वाढल्याने हारांच्याही किमती दुप्पट झाल्या आहेत. तसेच, गणेशोत्सवापर्यंत फुलांचे दर कमी होण्याची शक्यता दिसत नाही. सर्वाधिक मागणी असणाऱ्या गुलछडी फुलाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत."

- गणेश काळंगे, फुले व्यावसायिक

loading image
go to top