esakal | श्रीगणेश पुजा एका अर्थाने पृथ्वीचेच पूजन
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीगणेश पुजा एका अर्थाने पृथ्वीचेच पूजन

श्रीगणेश पुजा एका अर्थाने पृथ्वीचेच पूजन

sakal_logo
By
ॲड. विलास पाटणे

श्रीगणेश-गजानन हे केवळ महाराष्ट्राचे लाडके दैवत नसून साऱ्या व आशियात अत्यंत श्रद्धेने पूजा होते. भारतीय दैव पंथात तर त्याला महत्त्व आहेच, परंतु बौद्ध व जैनधर्मियांनी त्याला आपल्या दैवत पंथात समाविष्ट केले. यावरून त्याची महती पटते.

हेही वाचा: गणेशोत्सव 2021 : गणेशाचे वाहन मूषकच का?

श्रीगणेश रंगभूमीचा कर्ता आहे. तो नटेश्वरही आहे. तो रणांगणात लढणारा नायक आहे. तो गणांचा अधिपती सेनापती आहे. तो बुद्धिमान आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा आहे. तो निसर्गावर प्रेम करणारा व रक्षण करणारा आहे. तो विघ्नहर्ता, दुःखहर्ता आणि सुखकर्ता आहे.

भाद्रपद शुल्क चतुर्थीला गणेशमूर्तीचे आपण पूजन करतो, ते एका अर्थाने पृथ्वीचे पूजन असते. निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण गणेशाला अर्पण करतो. हे निसर्गाचेच पूजन असते. गणेशाची उपासना करताना आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे. श्रीगणेशाला आद्य लिपीदार मानले जाते. देवतांनी विनंती केल्यावर श्रीगणेशांनी वेद व्यासांनी रचलेले महाभारत लिपिबद्ध केले. गणपती अथर्वशीर्ष भारतीय लेखन परंपरेच स्रोत आहे. भारतामधील सर्व भाषा व लिपी व व्याकरणाचे मूळ आधार अथर्वशीर्ष आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव 2021 : गणेश चतुर्थीचे महत्त्व

श्रीगणेश सर्व गणांचा अधिपती ६४ कला व १४ विद्येचा अधिपती. संस्कृती, समाज आणि मानवी उत्थानाशी अतूट नाते असलेल्या गणेश पूजनाचे मूळ निसर्गात आहे. ज्ञानातून मोक्ष प्राप्त होतो या संकल्पेतून गणेशाची व्युतप्ती मान्य केली की, श्रीगणेश अक्षरदेवता आहे हे आपल्या लक्षात येते. ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि’ बुद्धिदाता गणेशाच्या उपासनेचा मार्ग ज्ञान-विज्ञानाच्या दिशेने जातो.

loading image
go to top