esakal | गणेशाची मुर्तीची उंची किती असावी?
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh-idol-siize.jpg

घरातील पूजेसाठी मूर्तीची उंची ही नऊ ते दहा इंचांपासून एका फुटापर्यंत असावी. त्यापेक्षा अधिक असू नये. शास्त्रांतील संकेताप्रमाणे यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती मंदिरांत स्थापन कराव्यात. देव्हाऱ्यातील देवांना लागू असणाऱ्या निर्बंधाप्रमाणेच घरातील उत्सवमूर्तीसुद्धा बेसुमार आकार, उंचीच्या नसाव्यात.

गणेशाची मुर्तीची उंची किती असावी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घरातील पूजेसाठी मूर्तीची उंची ही नऊ ते दहा इंचांपासून एका फुटापर्यंत असावी. त्यापेक्षा अधिक असू नये. शास्त्रांतील संकेताप्रमाणे यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती मंदिरांत स्थापन कराव्यात. देव्हाऱ्यातील देवांना लागू असणाऱ्या निर्बंधाप्रमाणेच घरातील उत्सवमूर्तीसुद्धा बेसुमार आकार, उंचीच्या नसाव्यात.

अलीकडच्या काळात निरनिराळ्या प्रदर्शनामध्ये आकर्षक मूर्ती पाहावयास मिळतात. अशा मूर्ती खरेदी करून घरी "शो-पीस' म्हणून ठेवणे, ही एक प्रतिष्ठेची बाब ठरू लागली आहे. कित्येक मान्यवरांनादेखील चांदीच्या, पंचराशी धातूंच्या, व्हाईट मेटलच्या मूर्ती भेट म्हणून देण्यात येतात. ही मूर्ती घरात जेथे ठेवली जाते, त्या दिवाणखान्यात अथवा अन्य ठळक वठिकाणी मूर्तीची गणेशोत्सवामध्ये पूजा केली तर चालेल का? याचे उत्तर आहे, 'अवश्‍य करा.

''सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, श्रद्धा, भक्‍ती, धर्माची मूळ मर्यादा. ज्याला आज 'शो' म्हणतात. मूर्तीच्या आकाराच्या मोठेपणापणाबाबत स्पर्धा नकोच. महत्त्व आहे ते विद्येची देवता मानल्या गेलेल्या श्री गणेशाच्या प्रतिष्ठेला. विसर्जन पूजा करून या शृंगेरी शारदा पीठ आणि उत्तरेला वाराणसीचे पंडितराज राजेश्‍वरशास्त्री द्रविड यांवे सांगवेद विद्यालय या दोनच ठिकाणी गणेशोत्सवात भारतातील न्याय, व्याकरण, वेदांत, मीमांसा, धर्मशास्त्र, ज्योतिष या शास्त्रांतील दिग्गज पंडितांना दहा दिवस मानाने निमंत्रित करून त्यांची शास्त्रर्थ पंडितसभा (वाक्‍यार्थ सभा) होते.

शृंगेरी येथे तर गणेशोत्सवामध्ये दहा दिवस सर्वजण पंडितसभेला उपस्थित असतात. संस्कृत पूर्वोतरपक्ष चर्चेत (संस्कृत माध्यमातून) सन्माननीय पुरस्कार देतात. अशी विद्येची बूज अन्य ठिकाणी दिसत नाही. "शारदा ज्ञान पीठम्‌'चे सर्व गणेशभक्‍तांना कळकळीचे आवाहन आहे, की प्रत्येकाकडे जी 'विद्या' अथवा 'कला' असेल, ती श्री गणेशाला (घरी असो अथवा चौकांत) स्वतःची विनम्र साधना, सेवा म्हणून अर्पण करावी. ही सर्वश्रेष्ठ गणेशपूजा आहे. तो खराखुरा गणेशोत्सव आहे. विद्या टिकवावी आणि विद्येची वृद्धी करावी, हा तर 'गणेशविद्या' उपासनेचा मूलमंत्र आहे. 

गणेश पुजनाची योग्य वेळ कोणती?
का करावी गणपतीची पूजा? जाणुन घ्या शास्त्र
गणपतीपुढे का म्हणतो आपण अथर्वशीर्ष?
गणपती अन् समज गैरसमज​
'श्रीं'ची मूर्ती कशी असावी?​

loading image
go to top