esakal | औरंगाबादचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती  
sakal

बोलून बातमी शोधा

aura shri sanstahn ganpati.jpg
  • लोकमान्य टिळक ही येत असत दर्शनसाठी. 
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता नवस.

औरंगाबादचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती  

sakal_logo
By
प्रताप अवचार

औरंगाबाद : श्री संस्थान गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिराला प्राचीन असा वारसा आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे असे म्हटले जाते. १९६० पासून या मंदिराची व्यवस्था ट्रस्टद्वारे केली जाते. औरंगाबादेत लोकमान्य टिळक येत, तेव्हा संस्थान गणपतीच्या दर्शन घेतल्याशिवाय रहात नसे. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा या गणपतीला शिवसेनेच्या विजयासाठी नवस केला होता.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

अनेक सामाजिक उपक्रम या मंदिरामार्फत राबविले जातात. गणेश उत्सवात येथे प्रत्येक दिवशी अन्नदान केले जाते. राजाबाजारात खऱ्या अर्थाने राजा राहतो अशी भक्तांची भावना आहे. मंदिराकडून वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती सगळीकडे आहे. १९८३ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात झाली.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

नवसाचा गणपती
शहरातील प्राचीन मंदिर असलेला संस्थान गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे असं म्हणलं जातं आणि त्यामुळेच या ठिकाणी नवस करणाऱ्यांची रांग लागते. स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या यशासाठी संस्थान गणपतीला नवस केला होता. शहरातील अनेक भाविक या ठिकाणी नवस करतात. अनेक व्यापाऱ्यांकडून या संस्थानासाठी सढळ हाताने मदत केली जाते.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात 

सजीव देखाव्यांची पर्वणी

गणेश उत्सवात दररोज अन्नदान आणि अथर्वशीर्ष पठण गणेश उत्सवात मंडळाकडून दररोज अन्नदान केले जाते. दररोजच्या महाप्रसादाला पाच ते सहा हजार भाविक प्रसाद घेतात. या ठिकाणी भंडाऱ्यासाठी देणगीदारांनासुद्धा नंबर लावावा लागतो. त्याचप्रमाणे गणेश उत्सवात या ठिकाणी दररोज गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन होते. या ठिकाणी देखाव्यांचे वेगळेपण संस्थानाने जपले आहे. यातील बहुतांश देखावे हे सजीव असतात.

काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर 

श्री. संस्थान गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहे. गणपती उत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी असते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जाणार नाही. परंतु आरोग्य उत्सव ही थीम घेऊन हा उपक्रम साजरा केला जाणार आहे, असे  संस्थान गणपती मंदिराचे प्रमुख प्रफुल्ल मालानी यांनी सांगीतले. 

loading image
go to top